12 तासांत दीड हजार रुपयांनी वाढली चांदी, सोन्याचा आजचा भाव काय, ग्रॅममागे किती मोजावे लागणार?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
दिल्लीसह मुंबई, चेन्नई, कोलकाता, जयपूर, लखनऊ, चंदीगड, अहमदाबाद, भोपाळ, हैदराबाद येथे सोन्या-चांदीच्या दरात घसरण; चांदीची औद्योगिक मागणी वाढली.
advertisement
22 कॅरेट सोन्याचाही दर कमी झाला आहे. तरीसुद्धा, गेल्या एका आठवड्यात 24 कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल 3,920 रुपयांची आणि 22 कॅरेट सोन्याच्या दरात 3,600 रुपयांची वाढ झाली होती. दिल्लीमध्ये 6 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 1,19,540 रुपये इतका आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,09,590 रुपये प्रति 10 ग्रॅम नोंदवला गेला आहे.
advertisement
मुंबई, चेन्नई आणि कोलकात्यातील भाव या प्रमुख शहरांमध्ये सध्या 22 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 1,09,440 रुपये असून, 24 कॅरेट सोन्याचा दर 1,19,390 रुपये आहे. जयपूर, लखनऊ आणि चंदीगड इथे 24 कॅरेट सोन्याचा दर दिल्लीप्रमाणेच 10 ग्रॅमसाठी 1,19,540 रुपये आहे, तर 22 कॅरेटचा दर 1,09,590 रुपये नोंदवला गेला आहे.
advertisement
advertisement
24 कॅरेट एक ग्रॅमसाठी ग्राहकांना 12 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. 22 कॅरेट एक ग्रॅमसाठी सोन्यासाठी 11070 रुपये मोजावे लागणार आहेत. तर 18 कॅरेट सोन्यासाठी 9 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. 8 ग्रॅम 18 कॅरेट सोन्यासाठी 72 हजार रुपये मोजावे लागणार आहे. इंडियन बुलियन असोसिएशनच्या दरांनुसार सोन्याचे दर आणखी वाढले आहेत.
advertisement
सोनेप्रमाणेच चांदीच्या दरातही घसरण दिसत आहे. 6 ऑक्टोबर रोजी चांदीचा दर घसरून प्रति किलोसाठी 1,54,900 रुपयांवर आला आहे. विशेष म्हणजे, मागील सप्टेंबर महिन्यात चांदीने किंमतवाढीच्या बाबतीत सोनेलाही मागे टाकले होते. गेल्या महिन्यात चांदीच्या दरात तब्बल 19.4 टक्क्यांची वाढ झाली होती, तर याच कालावधीत सोन्याचा दर 13 टक्क्यांनी वाढला.
advertisement