Gold Rate: खूशखबर! 3 दिवसांत 4800 रुपयांनी स्वस्त, आज तोळ्याला किती मोजावे लागणार?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Gold Rate Today: गेल्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरांत सातत्याने घट होतेय. नाशिक सराफा बाजारात सोनं पुन्हा स्वस्त झालंय.
advertisement
advertisement
नाशिक सराफा बाजारात आज 400 रुपये प्रतितोळा प्रमाणे सोनं स्वस्त झालं. त्यामुळे आता 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्यासाठी 93 हजार 800 रुपये मोजावे लागतील. तर तेवढ्याच मोडीसाठी 90 हजार 986 रुपये मिळतील. 22 कॅरेटच्या दागिन्यांसाठी प्रतितोळा 85 हजार 921 रुपये मोजावे लागतील. तर 22 कॅरेट मोडीस तुम्हाला 83,343 रुपये मिळणार आहेत.
advertisement
advertisement


