सोन्याचे भविष्य' ऐकून चक्रावाल! गोयनका म्हणतात १ किलो सोन्याची किंमत प्रायवेट जेट एवढी असेल
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
हर्ष गोयनका यांच्या निरीक्षणानुसार सोन्याच्या किंमती सतत वाढत असून 2025 मध्ये 1 किलो सोनं लँड रोव्हरच्या किंमतीइतकं झालं आहे. IBJA नुसार दर 1,26,792 रुपयांवर पोहोचले.
या वर्षा सोन्याच्या किंमती 50 हजार रुपयांनी वाढल्या आहेत. अनेक राज्यांमध्ये सोनं 1 लाख 29 हजार रुपयांवर गेलं आहे. 10 ग्रॅम सोन्याचा दर 2024 साली ७६ हजार होता. जो आता 1 लाख 26 हजार रुपये झाला आहे. आणखी सोन्याच्या किंमती वाढणारच आहेत. आता कमी होण्याची शक्यता फारच कमी आहे. भविष्यात एक किलो सोन्यात प्रायवेट जेट येईल असा दावा त्यांनी केला आहे.
advertisement
भारतातील एक प्रसिद्ध उद्योगपती आणि आरपीजी ग्रुपचे अध्यक्ष हर्ष गोयनका यांनी सोन्याच्या वाढत्या किमतीबद्दल एक अत्यंत मनोरंजक निरीक्षण नोंदवले आहे. त्यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये गेल्या काही दशकांत १ किलो सोन्याची किंमत आणि त्या किमतीत येणाऱ्या कारची तुलना केली आहे. त्यांच्या मते, १९९० मध्ये १ किलो सोन्याची जी किंमत होती, त्यात मारुती ८०० ही कार येत होती, तर २०२५ मध्ये तेच सोने 'लँड रोव्हर' या लक्झरी कारच्या किंमतीच्या बरोबरीचे झाले आहे.
advertisement
त्यांच्या मते 1990 साली 1 किलो सोन्याची किंमत मारुती 800 एवढी होती. तर 2000 साली त्याच एक किलो सोन्याची किंमत मारुती एस्टीम जी मध्यमवर्गीयांची कार एवढी होती. 2005 रोजी 1 किलो सोन्याची किंमत टोयोटा इनोव्हा एवढी होती. ज्याला फॅमिली एसयूव्ही म्हणू शकतो. 2010 रोजी एक किलो सोन्याची किंमत टोयोटा कार एवढी होती.
advertisement
2019 रोजी एक किलो सोन्याची किंमत एका बीएमडब्लू कार एवढी होती. 2025 रोजी एक किलो सोन्याची किंमत लँड रोव्हर एवढी होती. आता सोन्याची किंमत १ लाख 30 हजार रुपयांच्या आसपास आहे. कारची किंमत एकदा खरेदी करुन विकल्यावर कमी होते पण या आलेखात कुठेच सोन्याची किंमत कमी झालेली दिसत नाही याउलट दुपटीने वाढत आहे.
advertisement
१ किलो सोने जपून ठेवा. २०३० मध्ये त्याची किंमत रोल्स-रॉयस कार एवढी असू शकते आणि २०४० मध्ये तर ते एका प्रायव्हेट जेटच्या किंमतीच्या बरोबरीचे असेल." त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. गोयनका यांच्या या विश्लेषणानंतर सोन्याच्या दरांनी आज पुन्हा एकदा उसळी घेतली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, आज १० ग्रॅम (२४ कॅरेट) सोन्याचे दर ६४० रुपयांनी वाढून १,२६,७९२ रुपयांवर पोहोचले. काल हे दर १,२६,१५२ रुपये होते.
advertisement
[caption id="attachment_1495035" align="alignnone" width="1200"] सणांदरम्यानची मागणी: दिवाळी आणि धनत्रयोदशी या सणांमुळे सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. उच्च दर असूनही, बाजारामध्ये खरेदीचा उत्साह कायम आहे. २. भू-राजकीय तणाव: मध्यपूर्वेतील अस्थिरता आणि व्यापार युद्धांच्या चिंतेमुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळले आहेत. अमेरिकेच्या धोरणांविषयीची अनिश्चितता देखील वाढली आहे. ३. मध्यवर्ती बँकांची खरेदी: जगभरातील मोठ्या मध्यवर्ती बँका डॉलरवरील आपले अवलंबित्व कमी करू इच्छित आहेत. त्यामुळे ते आपल्या गंगाजळीत सोन्याचा हिस्सा सतत वाढवत आहेत.</dd>
<dd>[/caption]
advertisement
या वाढत्या किमतीबद्दल जागतिक गुंतवणूक संस्थांनी मोठे अंदाज वर्तवले आहेत. गोल्डमन सॅक्सने आपल्या अहवालात पुढील वर्षापर्यंत सोन्यासाठी प्रति औंस ५००० डॉलरचे लक्ष्य ठेवले आहे. सध्याच्या विनिमय दरानुसार, रुपयांमध्ये हे लक्ष्य प्रति १० ग्रॅम जवळपास १.५५ लाख रुपये इतके असेल. याचप्रमाणे, पीएल कॅपिटल या ब्रोकरेज फर्मने सोन्यासाठी १.४४ लाख रुपयांचे लक्ष्य ठेवले आहे. यावरून येत्या काळात सोन्यातील गुंतवणूक किती फायद्याची ठरू शकते, याचा अंदाज येतो.