आता यायला लागतंय! चहा प्या, कप खा; जालन्याच्या तरुणाची भन्नाट आयडिया
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Tea Business: जालन्यातील एका युवकाने तर चहाच्या प्लास्टिक कपला भन्नाट पर्याय शोधला आहे. चहा घेतल्यानंतर कप फेकून न देता तो खाता येतो.
advertisement
जालन्यातील एका युवकाने तर चहाच्या प्लास्टिक कपला भन्नाट पर्याय शोधला आहे. चहा घेतल्यानंतर कप फेकून न देता तो खाता येईल अशा पद्धतीचे चहाचे कप उपलब्ध केले आहेत. यामुळे पर्यावरणातील प्लास्टिक कमी होण्यास देखील मदत होणार आहे. ‘चहा प्या अन् कप खा’ हा उपक्रम नेमका काय आहे? याबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
जालना शहरातील एका महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्सचं शिक्षण घेणाऱ्या रियान कादरी या विद्यार्थ्याने शहरातील सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या समोर ‘सिट अँड बाईट’ नावाने चहाचं दुकान सुरू केलं आहे. इथं चहाबरोबर दिला जाणारा कप हा गहू, रागी आणि मैदा यापासून तयार केलेला आहे. चहा घेतल्यानंतर हा कप आपल्याला खाता देखील येतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
प्लास्टिकच्या कपमध्ये चहा घेतल्यानंतर तो फेकून दिला जातो. फेकलेला प्लास्टिक कप डिस्पोज व्हायला किमान 20 वर्षे लागतात. त्याचबरोबर अशा कपात चहा घेतल्याने कॅन्सरचा धोका देखील निर्माण होऊ शकतो. परंतु या पद्धतीच्या कपामध्ये चहा घेतल्यानंतर कॅन्सरचा धोका तर टाळता येईलच, त्याचबरोबर पर्यावरण संरक्षणाला देखील मदत होईल, असं रियान कादरी याने सांगितलं.