Chamomile Flower : झेंडू, गुलाब नाही तर 'या' फुलांची शेती करेल करोडपती
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
Chamomile Flower : जादुई फुलाचे नाव ऐकल्यावर तुमच्या मनात काय येते? ते घेऊन तुम्ही श्रीमंत व्हाल किंवा त्याच्या मदतीने तुम्ही पैसे कमवू शकता.
एखाद्या फुलामुळे कोणी धनवान बनू शकतं का? या प्रश्नाचं उत्तर हो असं येईल. कारण कॅमोमाइलची फुलं तुम्हाला खरोखरच धनवान बनवू शकतात. या फुलांमध्ये काही जादू आहे, असं तुम्हाला वाटेल. खरं तर तसं नाही. या फुलांच्या शेतीमधून तुम्हाला भरपूर उत्पन्न मिळू शकतं. बाजारात या फुलांना खूप मागणी असते. या फुलांच्या शेतीतून 5-6 पट नफा कमावता येऊ शकतो. त्यामुळे कोट्यधीश बनण्याचं तुमचं स्वप्न असेल, तर कॅमोमाइल फुलांची शेती करता येऊ शकते. ‘एबीपी’ने त्याबाबत माहिती देणारं वृत्त दिलं आहे.
advertisement
शेतीतून चांगलं उत्पन्न मिळत नसेल, तर फुलांच्या शेतीचा पर्याय चांगला ठरू शकतो. त्यातही कॅमोमाइल फुलांची शेती तुम्हाला उत्तम पैसा मिळवून देऊ शकते. या व्यवसायात नुकसानीची शक्यता खूपच कमी असते. कॅमोमाइल फुलांच्या पाकळ्या पांढऱ्या रंगाच्या असतात व त्यांना मंद सुगंध असतो. डेझीच्या फुलासारखं दिसणारं हे फूल असतं. या फुलांचे उल्लेख रोमन, ग्रीक साहित्यातही आढळले आहेत. (सर्व फोटो - कॅन्वा)
advertisement
advertisement
या फुलांना बाजारात खूप मागणी आहे. त्याच्या शेतीसाठी फार गुंतवणूक करावी लागत नाही. 10 ते 12 हजार रुपये गुंतवून तुम्ही त्यातून 5-6 पट जास्त नफा कमावू शकता. सातत्याने ही शेती केली, तर कोट्यधीशही होऊ शकता. या फुलांचे अनेक उपयोग आहेत. या फुलांपासून आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक औषधं तयार केली जातात. त्यामुळे कंपन्यांकडून या फुलांना सतत मागणी असते. सौंदर्यप्रसाधनांमध्येही ही फुलं उपयुक्त ठरतात.
advertisement









