Success story: पुण्यातील इंजिनिअरचा असाही व्यवसाय, कचऱ्यातून केली खत निर्मिती, वर्षाला 3 कोटींचा टर्नओव्हर
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
कुणाल जगताप या तरुणाने 2020 साली HAB Biomass ही कंपनीची स्थापना केली. या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या थेट बांधावर जात काडी,कचरा, पिकांच्या राहिलेला कच्चामाल यावर प्रक्रिया करून खत निर्मिती केली जाते.
कोणतीही वस्तू कचरा नसते आपण ती कचरा बनवतो. आपण ज्याला कचरा म्हणतो, त्याचा काही ना काही उपयोग होतोच. या शोधात कुणाल जगताप या तरुणाने 2020 साली HAB Biomass ही कंपनीची स्थापना केली. या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या थेट बांधावर जात काडी,कचरा, पिकांच्या राहिलेला कच्चामाल यावर प्रक्रिया करून खत निर्मिती केली जाते. आज या कंपनीचा टर्नओव्हर तीन कोटी पेक्षाही जास्त आहे.
advertisement
कुणाल जगताप हे मेकॅनिकल इंजिनिअर आहेत त्यांनी एमबीए ऑपरेशन मधून केलं आहे.कुणालने 2020 मध्ये मानवनिर्मित कोळसा तयार करण्यासाठी ‘HAB Biomass Pvt. Ltd.’ नावाचा स्टार्टअप सुरू केला. त्यासाठी त्याने एक मोबाइल युनिट (मशीन) तयार केले, जी थेट शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जाते. संबंधित उसाचे पाचट आणि इतर ऍग्रो वेस्ट शेतकऱ्यांकडून खरेदी केले जातात, ज्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचे अतिरिक्त साधन मिळते. मशीनमध्ये या कचऱ्याचे रूपांतर बारीक भुसा मध्ये केले जाते आणि त्यातून बायोकोल तयार होतो.
advertisement
कचऱ्याचे रूपांतर तीन मुख्य प्रकारांमध्ये केले जाते. Fuel (इंधन) या माध्यमातून स्वच्छ ऊर्जेसाठी बायोमासपासून ब्रिकेट्स आणि पेललेट्स तयार केले जातात. Fertilizer (खत) या माध्यमातून मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी बायोचार आणि वर्मी कंपोस्ट तयार केले जाते. तर Fodder (चारा) या माध्यमातून जनावरांसाठी पोषणयुक्त चार्याचे ब्लॉक्स तयार केले जातात. या तिन्ही उपायांमुळे शेती शाश्वत बनते, पर्यावरणाचे रक्षण होते आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळते.
advertisement
advertisement
तसेच इंडिया-कॅनडा उद्योजकता उपक्रम आणि भारत सरकारच्या स्टार्टअप इंडिया फ्लॅगशिप प्रोग्राम टुगेदर 2023 मध्ये कुणाल यांच्या उपक्रमाची निवड टॉप 25 स्टार्टअप्समध्ये झाली. या व्यतिरिक्त भारत सरकारच्या नीति आयोगानेही त्यांच्या कंपनीत गुंतवणूक केली आहे.होते.अलीकडेच 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर त्यांना विशेष निमंत्रण देण्यात आले होते.असे अनेक सन्मान कुणाल जगताप यांच्या कंपनीला मिळाले आहेत.