आधार लिंक असेल तर खात्यावर पैसे येणार! मंत्री आदिती तटकरेंनी दूर केली शंका

Last Updated:
तुमच्या खात्यावर लाडकी बहीणचे पैसे आले का? नसेल तर काय आहे कारण? मंत्री आदिती तटकरेंनी सांगितलं
1/7
मुंबई: लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी जमा व्हायला सुरुवात झाली आहे. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा होण्याआधीच EkYC करणं बंधनकारक असेल. तशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

advertisement
2/7
आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस 10 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे.

3/7
महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून  https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील २ महिन्यांच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती असं म्हणत त्यांनी लाभार्थींना आवाहन केलं आहे.

4/7
ज्या महिला लाडकी बहीणसाठी E KYC करणार नाहीत त्यांची नावं लिस्टमधून बाद केली जाणार आहेत. लाभार्थ्यांना वेळेवर पैसे खात्यावर हवे असतील तर ही पडताळणी प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. लाभार्थ्यांची योग्य पडताळणी करण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य केली आहे. ज्या महिलांनी अद्याप आपल्या आधार लिंक बँक खात्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना तात्काळ ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. अन्यथा नाव बाद केलं जाणार आहे.

5/7
२१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपयांची आर्थिक मदत थेट त्यांच्या आधार लिंक बँक खात्यांमध्ये दिली जाते. ई केवायसीसाठी आता वडील किंवा नवऱ्याचं आधार कार्ड जोडणं देखील आवश्यक आहे. तुम्ही अडीच लाखपेक्षा जास्त उत्पन्न गटात बसत असाल किंवा चारचाकी गाडी असेल आयटीआर भरत असाल तर या योजनेतून बाद होऊ शकता.

6/7
ही योजना विशेषतः गरीब, विधवा, घटस्फोटित किंवा आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील महिलांसाठी आहे, जेणेकरून त्या त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारू शकतील आणि जीवनात चांगल्या संधी मिळवू शकतील. सरकारने असे म्हटले आहे की या योजनेअंतर्गत महिलांना केवळ आर्थिक मदत दिली जाणार नाही तर त्यांचे आरोग्य, पोषण आणि कुटुंबातील सामाजिक स्थिती देखील मजबूत केली जाईल.

7/7
लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली सरकारची आणि लाभार्थ्यांची फसवणूक करणाऱ्यांकडून पैसे वसूल केले जाणार आहेत. यामध्ये काही सरकारी लाभार्थ्यांचा देखील समावेश आहे ज्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे फसवणूक करणाऱ्यांना चांगलाच चाप बसणार आहे.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement