LIC चे 5 सुपरहिट फंड करतील मालामाल! या समोर FD ही फिकी, रिटर्न पाहून व्हाल चकीत

Last Updated:
LIC Best Scheme : देशातील विश्वसनीय कंपन्यांमध्ये एलआयसी म्युच्युअल फंडचे नाव समाविष्ट आहे. ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC ची उपकंपनी आहे. एलआयसी म्युच्युअल फंड एप्रिल 1989 मध्ये सुरू झाला. एलआयसी म्युच्युअल फंडाच्या सर्व योजनांनी दीर्घकालीन गुंतवणूकदारांना उत्कृष्ट रिटर्न दिलंय. रेटिंग एजन्सी CRISIL ने देखील LIC म्युच्युअल फंडाला सरासरीपेक्षा वरचे रेटिंग दिले आहे. कंपनीचा ग्राहकवर्ग चांगला आहे.
1/7
LIC म्युच्युअल फंडाच्या इक्विटी, डेट आणि हायब्रिड कॅटेगिरीमध्ये अनेक योजना आहेत. आज आम्ही तुम्हाला LIC म्युच्युअल फंडाच्या अशा 5 योजनांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी गेल्या 10 वर्षांत गुंतवणूकदारांना 12 ते 16% वार्षिक रिटर्न दिलंय.

advertisement
2/7
व्हॅल्यू रिसर्चनुसार, LIC FM इन्फ्रास्ट्रक्चर फंडाने 10 वर्षांच्या एकरकमी गुंतवणुकीवर 16.33 टक्के रिटर्न दिलंय. दहा वर्षांपूर्वी या फंडात एक लाख रुपये गुंतवणाऱ्या गुंतवणूकदाराचे गुंतवणूक मूल्य आता 4,54,794 रुपये झाले आहे. त्याच वेळी, या फंडाचा एसआयपी रिटर्न 15.57 टक्के आहे. एलआयसीच्या या योजनेत, तुम्हाला किमान रु. 5000 एकरकमी गुंतवावे लागतील, तर तुम्ही रु. रुपये SIP सह देखील गुंतवणूक सुरू करू शकता.

3/7
LIC MF ELSS मध्ये पैसे लावून, तुम्ही केवळ उत्कृष्ट रिटर्न मिळवू शकत नाही, तर तुम्हाला टॅक्स लाभ देखील मिळू शकतात. दहा वर्षांपूर्वी या फंडात एकरकमी गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला 16% रिटर्न मिळाला. दुसरीकडे, ज्यांनी एसआयपीद्वारे पैसे गुंतवले होते त्यांना या कालावधीत 13.81 टक्के नफा मिळाला. या योजनेत किमान एकरकमी गुंतवणूक रु 5000 असू शकते, तर किमान SIP गुंतवणूक रु 1000 आहे.

4/7
उत्कृष्ट रिटर्न देणाऱ्या फंडांमध्ये LIC MF Nifty Next 50 Index Fund चे नाव देखील आहे. या फंडाने गेल्या 10 वर्षात एकरकमी गुंतवणुकीवर सरासरी 15.43% रिटर्न दिलंय. या फंडाने या कालावधीत 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे रूपांतर 4,20,720 रुपयांमध्ये केले आहे. यासोबतच, ज्या गुंतवणूकदारांनी एसआयपीद्वारे पैसे गुंतवले त्यांना सरासरी 12.30 टक्के रिटर्न मिळाला.

5/7
एलआयसी म्युच्युअल फंड लार्जकॅपने देखील गेल्या दहा वर्षांत गुंतवणूकदारांना एफडीच्या दुप्पट रिटर्न दिलंय. ज्यांनी लार्जकॅप फंडात एकरकमी गुंतवणूक केली त्यांना गेल्या दहा वर्षांत सरासरी 14.38% रिटर्न मिळालाय. या फंडातील SIP गुंतवणूकदारांनी गेल्या दहा वर्षांत सरासरी 12.33 % नफा कमावला आहे. 31 जुलै 2023 रोजी फंडाची एकूण मालमत्ता 1,368 कोटी रुपये होती, तर 30 जून 2023 रोजी खर्चाचे प्रमाण 1.39% होते. या योजनेत किमान एकरकमी गुंतवणूक 5000 रुपये असू शकते, तर किमान SIP गुंतवणूक 1000 रुपये आहे.

6/7
31 जुलै 2023 रोजी LIC MF Flexi Cap Fund ची एकूण मालमत्ता 856 कोटी रुपये होती. या योजनेत एकरकमी गुंतवणुकीसाठी तुम्हाला किमान 5000 रुपये गुंतवावे लागतील. तर, तुम्ही फक्त रु.1000 पासून SIP सुरू करू शकता. LIC MF Flexi Cap Fund ने गेल्या दहा वर्षात 12.62% एकरकमी रिटर्न आणि 11.10% SIP रिटर्न मिळवला आहे.

7/7
(Disclaimer: येथे सांगितलेले म्युच्युअल फंड हे आर्थिक सल्लागाराच्या सल्ल्यावर आधारित आहेत. जर तुम्हाला यापैकी कोणत्याहीमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर प्रथम सर्टिफाइड इनव्हेस्टमंट अ‍ॅव्हायजरचा सल्ला घ्या. तुमच्या नफा किंवा तोट्यासाठी News18 जबाबदार नाही.)

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement