नव्या वर्षात खिशाला चटका, 111 रुपयांनी महाग झाला गॅस सिलिंडर, तुम्हाला किती रुपयांना मिळणार चेक करा
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
LPG च्या १९ किलो कर्मशियल सिलिंडरच्या किमतीत १११ रुपयांची वाढ झाली असून, दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नईमध्ये हे नवे दर लागू झाले आहेत. घरगुती सिलिंडरचे दर स्थिर आहेत.
advertisement
१ जानेवारी २०२६ पासून १९ किलोच्या कर्मशिएल एलपीजी सिलिंडरच्या किमतीत तब्बल १११ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसह देशभरातील प्रमुख शहरांमध्ये हे नवे दर आजपासून लागू झाले आहेत. कर्मशियल गॅस सिलिंडर 19 किलोचे दर वाढल्याने त्याचा हॉटेल इंडस्ट्रीला मोठा फटका बसणार आहे.
advertisement
advertisement
व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढल्या असल्या तरी, १४ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. घरगुती सिलिंडरचे दर अद्यापही एप्रिल महिन्यापासून स्थिर आहेत. दिल्लीत घरगुती सिलिंडर ८५३ रुपये, तर मुंबईत ८५२ रुपयांना मिळत आहे. त्यामुळे गृहिणींना या दरवाढीतून तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
advertisement
विशेष म्हणजे, गेल्या दोन महिन्यांपासून व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत सलग कपात केली जात होती. १ डिसेंबर २०२५ रोजी किमतीत १० ते ११ रुपयांची घट झाली होती, तर नोव्हेंबरमध्येही दर कमी झाले होते. मात्र, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कंपन्यांनी १११ रुपयांची मोठी वाढ केल्याने व्यावसायिक वर्गातून संताप व्यक्त होत आहे.
advertisement











