Tax Planning करणाऱ्यांसाठी पोस्ट ऑफिसच्या या स्किम आहेत बेस्ट! मिळतं बंपर रिटर्न
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
मार्च महिना संपत आला आहे, अशा परिस्थितीत तुमच्याकडे आयकर नियोजनासाठी खूप कमी वेळ शिल्लक आहे. 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार असल्याने 31 मार्चनंतर तुम्हाला ही संधी मिळणार नाही. अशा परिस्थितीत, पोस्ट ऑफिसच्या अशा 5 स्कीम्सबद्दल जाणून घ्या ज्या तुम्हाला उत्तम रिटर्न देण्यासोबतच इन्कम टॅक्स वाचवण्यास मदत करू शकतात.
PPF : पब्लिक प्रोव्हिडेंट फंड लोकांच्या आवडत्या स्किम्सपैकी एक आहे. या स्किममध्ये तुम्हाला 7.1% दराने व्याज दिले जात आहे. ही स्कीम 15 वर्षांनी परिपक्व होते. यामध्ये, एका आर्थिक वर्षात दरवर्षी किमान 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करता येतात. ही स्किम तुम्हाला दीर्घकाळात मोठे पैसे कमवण्यास मदत करू शकते. ही स्किम EEE कॅटेगिरीमध्ये समाविष्ट आहे, म्हणून ही स्किम गुंतवणूक, रिटर्न आणि परिपक्वतेवर कर लाभ प्रदान करते.
advertisement
SSY : तुमची मुलगी 10 वर्षांपेक्षा कमी वयाची असेल, तर तुम्ही तिच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेत (SSY) गुंतवणूक करू शकता. या योजनेअंतर्गत 8.2 टक्के व्याज दिले जात आहे. यामध्ये तुम्ही दरवर्षी 250 रुपये ते 1.5 लाख रुपये जमा करू शकता. हे पैसे 15 वर्षांसाठी जमा केले जातात आणि जेव्हा मुलगी 21 वर्षांची होते तेव्हा व्याजासह संपूर्ण रक्कम गुंतवणूकदाराला परत केली जाते. पीपीएफ प्रमाणे, ही योजना देखील EEE कॅटेगिरी अंतर्गत येते, ज्यामध्ये गुंतवणूक, व्याज आणि परिपक्वता रकमेवर टॅक्स सूट उपलब्ध आहे.
advertisement
Post Office TD : पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट (पोस्ट ऑफिस टीडी), ज्याला पोस्ट ऑफिस एफडी असेही म्हणतात. तुम्ही त्यात गुंतवणूक करून टॅक्स देखील वाचवू शकता, परंतु यासाठी तुम्हाला 5 वर्षांच्या एफडीमध्ये गुंतवणूक करावी लागेल. 5 वर्षांच्या एफडीवर कर लाभ उपलब्ध आहेत. तर यापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर कर लाभ उपलब्ध नाहीत. पोस्ट ऑफिसमध्ये 5 वर्षांच्या एफडीवर 7.5% व्याज दिले जात आहे. हे आयकर कायदा, 1961 च्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर कपातीचा दावा करण्यास परवानगी देते.
advertisement
NSC : पोस्ट ऑफिस एफडी प्रमाणे, NSCमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला प्रॉफिटसह कर लाभ देखील मिळू शकतो. तुम्ही एनएससीमध्ये 1,000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. कमाल लिमिट नाही. सध्या त्यावर 7.7 टक्के व्याज दिले जात आहे. यामध्ये 5 वर्षांसाठी गुंतवणूक देखील करता येते. यामध्येही तुम्ही 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर कपातीचा दावा करू शकता.
advertisement
SCSS : सीनियर सीटीझन सेव्हिंग स्किमच्या नावावरूनच हे स्पष्ट होते की ती ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. ज्येष्ठ नागरिक या योजनेत 5 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकतात आणि कर वाचवू शकतात. यामध्ये गुंतवणूक 1,000 रुपयांपासून सुरू होऊ शकते आणि जास्तीत जास्त 30 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. या योजनेवर 8.2% व्याज दिले जात आहे. यामध्येही, वार्षिक 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर 80C अंतर्गत कर सूट मिळू शकते. परंतु यावर मिळणारे व्याज करपात्र आहे.