post office scheme for women : पत्नीच्या नावाने 1 लाख रुपये FD ठेवले तर 2 वर्षांत किती परतावा मिळेल?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
post office scheme for women: 100000 रुपयांची FD पत्नीच्या नावाने ठेवल्यास 730 दिवसांनंतर मिळणारा परतावा पाहून थक्क व्हाल!
advertisement
नियमित गुंतवणूक करणे हे दीर्घकाळात चांगले आणि खात्रीशीर उत्पन्न मिळवण्याचा सोपा मार्ग आहे. आज बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असले तरी, त्यात मोठा धोका असतो. याच कारणामुळे अनेक लोक आजही सरकारी योजना, बाँड्स किंवा बँक जमा योजनांसारख्या हमी परतावा देणाऱ्या पर्यायांना प्राधान्य देतात, कारण यातील धोका खूप कमी असतो. बँक जमा योजनांचा विचार केल्यास, डोळ्यासमोर सर्वात आधी फिक्स्ड डिपॉझिट योजनाच येतात.
advertisement
advertisement
advertisement
विशेष म्हणजे, आरबीआयने रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतरही, टपाल कार्यालय आपल्या ग्राहकांना पूर्वीचेच उच्च व्याजदर देत आहे. रेपो रेट कपातीचा या टपाल कार्यालयाच्या योजनांवर अद्याप कोणताही परिणाम झालेला नाही. टपाल कार्यालयात तुम्ही १ ते ५ वर्षांच्या कालावधीसाठी टाइम डिपॉझिट उघडता येतं. उघडू शकता आणि बँकांच्या एफडीप्रमाणेच यातही निश्चित कालावधीसाठी खात्रीशीर उत्पन्न मिळते.
advertisement
टपाल कार्यालय आपल्या ग्राहकांना १ वर्ष, २ वर्ष, ३ वर्ष आणि ५ वर्षांसाठी टीडी खाते उघडण्याचा पर्याय देते. यावर मिळणारे व्याजदरही आकर्षक आहेत: १ वर्षाच्या टीडीवर ६.९ टक्के, २ वर्षांच्या टीडीवर ७.० टक्के, ३ वर्षांच्या टीडीवर ७.१ टक्के आणि ५ वर्षांच्या टीडीवर ७.५ टक्के व्याजदर मिळत आहे. महत्त्वाचे म्हणजे, टपाल कार्यालयाच्या या योजनांमध्ये पुरुष, महिला किंवा ज्येष्ठ नागरिक सर्वच ग्राहकांना समान व्याजदर मिळतो. यात किमान १,००० रुपये जमा करण्याची मर्यादा आहे, तर कमाल रकमेची कोणतीही मर्यादा नाही.
advertisement
याच हिशेबाने, जर एखाद्या व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावावर टपाल कार्यालयात २४ महिन्यांसाठी (२ वर्षांसाठी) १,००,००० रुपये मुदत ठेव म्हणून गुंतवले, तर मुदतपूर्तीनंतर त्याला एकूण १,१४,८८८ रुपये मिळतील. यात मूळ १ लाख रुपयांव्यतिरिक्त १४,८८८ रुपये निव्वळ व्याज म्हणून मिळतील. ही योजना कोणत्याही धोक्याशिवाय (Risk-Free) आणि निश्चित हमीसह गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहे.