ऑक्टोबर महिन्यात किती दिवस किती दिवस बंद राहणार Share Market? इथे पाहा संपूर्ण शेड्युल

Last Updated:
ऑक्टोबरमध्ये Gandhi Jayanti, दसरा, दिवाळी, Balipratipada निमित्त BSE आणि NSE तीन दिवस बंद राहणार. 21 ऑक्टोबरला मुहूर्त ट्रेडिंग दुपारी 1:45 ते 2:45 होईल.
1/7
ऑक्टोबर महिन्यात अनेक सणवार आहेत, आधीच शनिवार रविवार मार्केट बंद असतं, त्यात यावेळी सणवार आल्यामुळे शेअर मार्केट जरा जास्त दिवस बंद राहणार आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ऑक्टोबर महिन्यात काही महत्त्वाचे बदल घडणार आहेत. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज यांच्या अधिकृत संकेतस्थळांवरील माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यात किती दिवस शेअर मार्केट बंद राहणार जाणून घेऊया.

advertisement
2/7
या महिन्यात तीन दिवस शेअर बाजार पूर्णपणे बंद राहणार आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच 2 ऑक्टोबरला गांधी जयंती आणि दसऱ्याच्या निमित्ताने बाजारात कोणतेही व्यवहार होणार नाहीत. हा दिवस राष्ट्रीय सुट्टीचा असल्याने शेअर बाजार बंद राहील.

3/7
ऑक्टोबर महिन्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 21 आणि 22 ऑक्टोबरला दिवाळी आणि बलिप्रतिपदा या कारणामुळे बाजार बंद राहणार आहे. मात्र 21 ऑक्टोबरच्या दिवशी गुंतवणूकदारांसाठी एक खास संधी उपलब्ध राहणार आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुहूर्त ट्रेडिंग होणार आहे.

4/7
मुहूर्त ट्रेडिंग सत्र 21 ऑक्टोबर रोजी ठेवण्यात आलं असून ते दुपारी 1:45 ते 2:45 या वेळेत होणार आहे. यंदा पहिल्यांदाच मुहूर्त ट्रेडिंग दुपारी होणार आहे. याआधी नेहमी संध्याकाळी होत असायचं, मात्र यंदा दुपारी ठेवण्यात आलं आहे.

5/7
ऑक्टोबरनंतर 5 नोव्हेंबरला प्रकाश गुरुपर्व आणि 25 डिसेंबरला ख्रिसमस असल्यानेही बाजार बंद राहील. तसेच या वर्षी 27 ऑगस्टला गणेश चतुर्थी निमित्त व्यवहार थांबले होते.

6/7
या सर्व सुट्ट्या लक्षात घेऊन गुंतवणूकदारांनी आपल्या व्यवहाराचे नियोजन करणे आवश्यक आहे. विशेषतः मुहूर्त ट्रेडिंगचा हा एक तास केवळ आर्थिक सत्र नसून भावनिक आणि पारंपरिकदृष्ट्याही महत्त्वाचा क्षण असतो, ज्याची गुंतवणूकदार वर्षभर आतुरतेने वाट पाहतात.

7/7
याशिवाय शनिवार आणि रविवार ट्रेडिंग बंद राहातं. त्यामुळे कोणतेही व्यवहार करता येत नाहीत. त्याशिवाय ऑक्टोबर महिन्यात तीन दिवस शेअर मार्केट बंद राहणार आहे. या तारखा आधीच नोंद करुन ठेवा. त्यामुळे तुमचं नुकसान होणार नाही.

Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement