पुरुषांनो इकडे लक्ष द्या! 'या' 5 सवयींमुळे तुमच्या पार्टनरचं होऊ शकतं गंभीर नुकसान; डाॅक्टर सांगतात...
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
5 extremely harmful habits of men : नात्यामध्ये प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणा हे आधारस्तंभ असतात. पण यासोबतच एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे एकमेकांच्या आरोग्याची काळजी घेणे. ही काळजी केवळ...
5 extremely harmful habits of men : नात्यामध्ये प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणा हे आधारस्तंभ असतात. पण यासोबतच एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे एकमेकांच्या आरोग्याची काळजी घेणे. ही काळजी केवळ "जेवलीस का?" किंवा "आराम कर" असे विचारण्यापुरती मर्यादित नसते. अनेकदा, विशेषतः पुरुष नकळतपणे अशा काही चुका करतात, ज्या त्यांच्या महिला पार्टनरच्या आरोग्यासाठी एक मोठा धोका बनू शकतात. प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. मनन वोरा यांनी याच गंभीर विषयावर प्रकाश टाकला आहे. त्यांच्या मते, पुरुषांच्या काही वैयक्तिक सवयी त्यांच्या पार्टनरसाठी गंभीर आजारांचे कारण ठरू शकतात. जर तुमचे तुमच्या पार्टनरवर खरंच प्रेम असेल, तर या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका.
पुरुषांनो, नात्याच्या आरोग्यासाठी या 5 सवयी आजच बदला
नखं आहेत की जंतूंचं घर?
डॉ. वोरा स्पष्ट करतात की, वाढलेली किंवा अस्वच्छ नखे म्हणजे बॅक्टेरिया आणि जंतूंचे घर. जेव्हा दोघेजण जवळ येतात, तेव्हा ही घाण आणि जंतू तुमच्या पार्टनरच्या त्वचेवर आणि गुप्तांगांमध्ये सहज पसरू शकतात. यामुळे त्यांना बुरशीजन्य (fungal) आणि योनीमार्गाच्या संसर्गाचा (Vaginal Infections) मोठा धोका निर्माण होतो. त्यामुळे, तुमची नखे नेहमी स्वच्छ आणि कापलेली ठेवा.
advertisement
आंघोळीचा कंटाळा पडेल महागात!
काही पुरुषांना रोज आंघोळ करण्याचा कंटाळा येतो. ही सवय केवळ तुमच्यासाठीच नाही, तर तुमच्या पार्टनरसाठीही हानिकारक आहे. घाम आणि धुळीमुळे शरीरावर जमा झालेले बॅक्टेरिया तुमच्या पार्टनरला त्वचेच्या समस्या आणि फंगल इन्फेक्शन देऊ शकतात. तुमची एक छोटीशी चूक तुमच्या प्रिय व्यक्तीच्या त्रासाचे कारण बनू शकते.
सिगारेटचा धूर, नातं होईल दूर...
पार्टनरसमोर धूम्रपान करणे हे तिच्या आरोग्याशी खेळण्यासारखे आहे. सिगारेटचा धूर (Second-hand smoke) केवळ तुमच्या फुफ्फुसांनाच नाही, तर तुमच्या पार्टनरच्या आरोग्यालाही पोखरतो. यामुळे महिलांमध्ये श्वासोच्छवासाचे आजार, ॲलर्जी आणि इतकेच नाही, तर त्यांच्या प्रजनन क्षमतेवरही (Fertility) गंभीर परिणाम होऊ शकतो.
advertisement
advertisement
टॉयलेट सीटची स्वच्छता : एक छोटी गोष्ट, पण परिणाम मोठा!
अनेक पुरुष लघवी करताना टॉयलेट सीट खराब करतात आणि ती तशीच सोडून देतात. ही अत्यंत वाईट सवय तुमच्या पार्टनरसाठी मूत्रमार्गाच्या संसर्गाला (UTI) आमंत्रण देऊ शकते. घाणेरड्या टॉयलेट सीटवर असलेले जंतू महिलांसाठी अत्यंत धोकादायक असतात. स्वच्छता राखणे ही दोघांचीही जबाबदारी आहे.
advertisement
जवळ येण्यापूर्वी... ही काळजी घ्यायलाच हवी!
डॉक्टरांच्या मते, जवळीक साधण्यापूर्वी हात स्वच्छ न धुणे ही एक मोठी चूक आहे. हातावर असलेले बॅक्टेरिया आणि जंतू थेट महिलेच्या शरीरात प्रवेश करून वारंवार UTI आणि इतर संक्रमणांना कारणीभूत ठरू शकतात. ही एक लहानशी सवय अनेक मोठ्या आजारांपासून तुमचे संरक्षण करू शकते.
या सवयी दिसायला अगदी सामान्य वाटू शकतात, पण त्याकडे लक्ष देणे हे तुमच्या प्रेमाची आणि जबाबदारीची खरी ओळख आहे. छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही केवळ तुमच्या पार्टनरचे आरोग्यच जपत नाही, तर तुमचे नाते अधिक घट्ट आणि निरोगी बनवता. कारण निरोगी नात्याचा पाया हा एकमेकांच्या आरोग्याच्या काळजीवरच उभा असतो.
advertisement
हे ही वाचा : Health Tips : प्रायव्हेट पार्टच्या स्वच्छतेसाठी साबण वापरावा की नाही? तज्ज्ञ काय सांगतात?
हे ही वाचा : Kids Health : मुलांचा स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी बेस्ट ट्रिक! हमखास सुटेल मोबाईलची सवय
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 29, 2025 12:46 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
पुरुषांनो इकडे लक्ष द्या! 'या' 5 सवयींमुळे तुमच्या पार्टनरचं होऊ शकतं गंभीर नुकसान; डाॅक्टर सांगतात...