22 आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांमध्ये काय फरक? रोजच्या वापरासाठी कोणतं बेस्ट?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
22, 23, 18, 20 हे कॅरेट काय आहेत ते आधी समजून घ्या. त्यानंतर रोजच्या वापरासाठी किती कॅरेटमध्ये दागिने करणं फायद्याचं आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊया.
22 कॅरेट सोनं सर्वात बेस्ट म्हणून तुम्ही जर 22 कॅरेट सोनं घेण्याचा हट्ट नेहमी धरत असाल तर थांबा, तुमच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. 22, 23, 18, 20 हे कॅरेट काय आहेत ते आधी समजून घ्या. त्यानंतर रोजच्या वापरासाठी किती कॅरेटमध्ये दागिने करणं फायद्याचं आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊया. नाहीतर काय ज्यांच्याकडे पैसे आहे ते तर 22 काय अन् 23 काय कितीही कॅरेटमध्ये करु शकतात त्याबाबत काय अडचण नसते. मात्र ज्यांना खरंच घतलेले दागिने सतत तुटू नये असं वाटत असेल त्यांच्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे.
advertisement
advertisement
22 कॅरेटमध्ये सोन्याचं प्रमाण 100 टक्क्यांपैकी 91.67 टक्के असतं. त्यासोबत चांदी, तांबे असं इतर धातू मिसळले जातात. 18 कॅरेटमध्ये 75 टक्के शुद्ध सोनं असतं, त्यासोबत चांदी, तांबे, इतर धातू मिसळले जातात. 18 कॅरेटचे दागिने इतर धातू त्यामध्ये जास्त मिसळल्याने अधिक मजबूत असतात. दागिने मोडण्याचा, तुटण्याचा धोका कमी असतो. त्यासाठी येणारा खर्चही 22 कॅरेटपेक्षा कमी असतो.
advertisement
advertisement
advertisement
शुद्ध सोनं एकदम मऊ असतं, जसा आकार देऊ तसं वळतं, ते मोडण्याची भीती असते. त्याला नीट आकारही देता येत नाही. त्यामुळे त्यामध्ये इतर धातू मिसळून त्यापासून दागिने तयार केले जातात. त्या दागिन्यांवर नक्षीकाम करण्यासाठी त्याला थोडा ताठपणा आणावा लागतो. २२ आणि २० आणि 18 कॅरेटचे दागिने खरेदी करताना कायम होलमार्कचेच दागिने खरेदी करावे.
advertisement