Mumbai Coastal Road : कोस्टल रोडवर स्पीड लिमिटचे तीनतेरा, बोगद्यातच 150 किमी ताशी वेगाने चालवली वाहनं

Last Updated:

Coastal Road Speeding Violation Incident :कोस्टल रोडवरील वाहनचालकांमध्ये वेगमर्यादेचे उल्लंघन मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.यामुळे अपघात होण्याचा धोका वाढला असून पोलिसांनी नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.

News18
News18
मुंबई : मुंबई सागरी किनारा मार्ग हा शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा असून हा मार्ग सुरु होताच वाहनचालकांकडून वेगमर्यादाचे धक्कादायक रीतीने उल्लंघन केले जात आहे. या वर्षी जुलै महिन्यात या मार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बसवलेल्या अनेक सीसीटीव्ही कॅमेर्‍यांमध्ये ही धक्कादायक माहिती कैद झाली आहे. फक्त काही महिन्यांत तब्बल आठ हजारहून अधिक वाहनांनी मार्गावरील वेगमर्यादेचे उल्लंघन केले असून, बोगद्यातून जाणाऱ्या काही वाहनांचा वेग 141 ते 147 किलोमीटर प्रतितास पर्यंत पोहोचल्याचे कॅमेर्‍यांमध्ये दिसून येत आहे.
शामलदास गांधी मार्गावरील (प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपूल ते वरळी-वांद्रे सागरी सेतूपर्यंतचा सागरी मार्ग प्रकल्प प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तयार करण्यात आला आहे. संपूर्ण मार्गावर ठिकठिकाणी वेग ओळखणारे आणि अपघात प्रतिबंधक 236 कॅमेरे बसवण्यात आले असून हे कॅमेरे वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी जोडले गेले आहेत.
'इतकी' आहे वेगमर्यादा
या मार्गावरील बोगदा दोन किलोमीटर लांब असून त्यात वाहतूक करणाऱ्या वाहनांची वेगमर्यादा 60 किमी प्रतितास ठेवण्यात आली आहे, तर उर्वरित मार्गावर 80 किमी प्रतितासची वेगमर्यादा आहे. मात्र, वाहनचालक नियमांचे उल्लंघन करत वेगाने धडाधड मार्गावरून प्रवास करत आहेत. खासकरून मध्यरात्रीनंतर वाहनांची वर्दळ कमी असताना हे उल्लंघन अधिक जास्त आढळले आहे.
advertisement
महापालिकेने 15 ऑगस्टपासून हा मार्ग वाहनांसाठी 24 तास खुला केला.परंतु यामुळे काही काळा वेळी वाहनचालक अत्यंत वेगाने वाहन चालवण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः मध्यरात्री 12 ते दुपारी 3 या कालावधीत तसेच सकाळी 6 ते 8 या वेळेतही वेगमर्यादेचे उल्लंघन मोठ्या प्रमाणावर नोंदले गेले आहे.
बोगद्याचे प्रवेशद्वार आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणी चार कॅमेरे बसवण्यात आले आहेत जेथे वाहनांची संख्या मोजली जाते आणि त्यांचे वर्गीकरण केले जाते. याशिवाय किनारा मार्गावर वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नियम मोडणारी वाहने ओळखण्यासाठी सात अतिरिक्त कॅमेरे बसवले आहेत.
advertisement
या सर्व माहितीवरून स्पष्ट होते की, मुंबईच्या सागरी किनारा मार्गावर वाहनचालक नियमांचे पालन करण्याऐवजी धोकादायक वेगाने वाहन चालवण्यास मागेपुढे पाहत नाहीत. जर अशा प्रकारे नियम मोडणे सुरू राहिले तर या मार्गावर अपघातांचा धोका अत्यंत वाढेल. प्रवाशांनी आणि वाहनचालकांनी दक्षता घेणे गरजेचे ठरत आहे.
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Coastal Road : कोस्टल रोडवर स्पीड लिमिटचे तीनतेरा, बोगद्यातच 150 किमी ताशी वेगाने चालवली वाहनं
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement