Comedian Struggle Story : दारूच्या अड्ड्यावर काम, सातवीत शिक्षण सोडलं; आज आहे देशातील सर्वात श्रीमंत कॉमेडियन! ओळखलं का?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Comedian Struggle Story : देशातील टॉप विनोदविरांपैकी एक असलेल्या या कलाकाराने कधी दारुच्या ठेल्यावर काम केलंय, तर कधी फुटपाथवर पेन विकलेत. झोपडपट्टीत राहून गरीबीत दिवस काढणाऱ्या या कॉमेडियनचा संघर्ष निराळा आहे.
Comedian Struggle Story : बॉलीवूडमधील प्रत्येक स्टारची वेगळीच कहाणी असते. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांचा संघर्ष, त्यांचा भूतताळ डोळ्यात पाणी आणणारा आहे. कॉमेडीच्या जगात मोठे नाव असणाऱ्या या विनोदवीराचा संघर्षही निराळा आहे. कधीकाळी कठीण काळात आपलं आयुष्य घालवलेल्या या विनोदविराला आपलं नशीब पलटायला वेळ लागला. पण त्यांच्या टॅलेंटच्या जोरावर त्याने स्वतःला सिद्ध केलं. आज या विनोदवीराचं नाव देशातील सर्वोत्तम कॉमेडी अभिनेत्यांच्या यादीत समाविष्ट आहे. पण फारच कमी लोकांना माहिती आहे की एकेकाळी या विनोदवीराला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आहे. एखाद्या चित्रपटांतील मुख्य आकर्षण म्हणजे नायक-नायिका असतात. पण सहाय्यक भूमिका करणारे कलाकारदेखील अनेकदा कमाल करतात. आजच्या घडीला इंडस्ट्रीमध्ये एका विनोदविराने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि ‘कॉमेडी किंग’चा टॅगदेखील मिळवला आहे. त्याने शेकडो चित्रपटांना आपल्या कॉमेडीच्या छटांनी रंगवलं आहे. देशातील टॉप विनोदविरांपैकी एक असलेल्या या कलाकाराने कधी दारुच्या ठेल्यावर काम केलंय, तर कधी फुटपाथवर पेन विकलेत. झोपडपट्टीत राहून गरीबीत दिवस काढणाऱ्या या कॉमेडियनचा संघर्ष निराळा आहे.
सातवीत शिक्षण सोडलं...
जॉनी लिव्हरने 80-90 च्या दशकात आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. जॉनी लिव्हरचं खरं नाव जॉन प्रकाश राव जनुमाला असं आहे. आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यात 14 ऑगस्ट 1957 रोजी जॉनी लिव्हरचा एका तेलुगू ख्रिस्ती कुटुंबात जन्म झाला. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने शाळेत असताना जॉनी लिव्हरने दारूच्या दुकानातही काम केलं आहे. झोपडपट्टीत राहून दिवस त्याने दिवस काढले आहेत. शाळा सुटल्यानंतर तो दारूच्या अड्ड्यावर काम करत असे. सातवीत असताना जॉनीला शिक्षण सोडावं लागलं होतं.
advertisement
फुटपाथवर पेन विकले
जॉनी लिव्हरने कुटुंबाला आर्थिक मदत करण्याच्या हेतूने फुटपाथवर पेन विकले. त्याची पेन विकण्याची स्टाईलदेखील खूप हटके होती. बॉलिवूड सेलिब्रिटींची मिमिक्री करत ग्राहकांना हसवत-हसवत तो फुटपाथवर पेन विकायचा. एका मुलाखतीत जॉनी लिव्हर म्हणाला होता,"मी आधी पेन विक्रीच्या माध्यमातून 25-30 रुपये कमवत असे. पण मिमिक्री करत पेन विकायला सुरुवात केली तेव्हा दिवसाला अचानक 250-300 रुपयांची कमाई व्हायला लागली". पण रस्स्यावर पेन विकणाऱ्या या मुलाला तो देशातला टॉपचा कॉमेडी किंग होणार हे त्यावेळी माहिती नव्हतं.
advertisement
जॉनी लिव्हरचे वडील हिंदुस्तान लिव्हरमध्ये कामाला होते. वडिलांच्या मदतीने जॉनीदेखील तिथे कामाला लागला. हिंदुस्तान लिव्हरमध्येही जॉनी लिव्हर आपलं काम उत्तमप्रकारे करत होता. कामादरम्यान विरंगुळा म्हणून तो तेथील कर्मचाऱ्यांचं मनोरंजन करत असे. त्यावेळी मित्रांनी त्याचं नाव जॉन प्रकाश राव जनुमालावरुन जॉनी लिव्हर असं ठेवलं. मीडिया रिपोर्टनुसार, कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जॉनी लिव्हरला त्याच्या मिमिक्रीने प्रभावित होऊन हे नाव दिलं होतं.
advertisement
जॉनी लिव्हर विनोदासह मिमिक्री करण्यातही अव्वल होते. स्टँडअप कॉमेडियन म्हणून त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यावेळी त्याने अनेक स्टेज शो केले. त्यावेळी सुनील दत्तची नजर या विनोदवीरावर पडली आणि त्याचं आयुष्यचं बदललं. सुनील दत्तने 'दर्द का रिश्ता' (1982) या चित्रपटात जॉनी लिव्हरला पहिला ब्रेक दिला. जॉनी लिव्हरने आपल्या पहिल्याच चित्रपटाने बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण केली. त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही. जॉनी लिव्हरने आजवर अनेक चित्रपटांत आपल्या विनोदाची छाप पाडली आहे. पण 'राजा हिंदुस्तानी','जुदाई','चालबाज','बाजीगर','यस बॉस',करण-अर्जुन','इश्क','आंटी नंबर 1','दूल्हे राजा','कुछ कुछ होता है' या त्याच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
advertisement
जॉनी लिव्हरचं नेटवर्थ काय?
जॉनी लिव्हरची एकूण संपत्ती 277 कोटी रुपयांच्या आसपास आहे. चित्रपट आणि स्टेज शोच्या माध्यमातून जॉनी लिव्हर सर्वाधिक कमाई करतो. जॉनी लिव्हर सिने अँड टीवी आर्टिस्ट असोसिएशन आणि मिमिक्री आर्टिस्ट असोसिएशनचा प्रेसिडंट आहे. जॉनी लिव्हर प्रत्येक महिन्याला 1 कोटी रुपयांच्या आसपास पैसे कमावतो. त्यामुळे वर्षाची त्याची कमाई 12 कोटी रुपयांच्या आसपास आहे. मुंबईतील लोखंडवालामध्ये जॉनीचं 3BHK घर आहे. जॉनीला गाड्यांचीदेखील तेवढीच आवड आहे. त्याच्याकडे Audi Q7, Honda Accord, Toyota fortuner सारख्या महागड्या गाड्या आहेत.
advertisement
जॉनी लिव्हर 1984 मध्ये सुजातासोबत लग्नबंधनात अडकला. जॉनी लिव्हरला दोन मुलं, एक मुलगी आणि एक मुलगा आहे. त्याची दोन्ही मुलं आपल्या वडिलांप्रमाणेच कॉमेडियन आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 29, 2025 11:30 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Comedian Struggle Story : दारूच्या अड्ड्यावर काम, सातवीत शिक्षण सोडलं; आज आहे देशातील सर्वात श्रीमंत कॉमेडियन! ओळखलं का?