IND VS PAK: अमिताभ यांनी पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळलं, म्हणाले, 'काय खेळलास अभिषेक बच्चन...'
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
IND VS PAK: भारताने पाकिस्तानला हरवून नवव्यांदा आशिया कप चॅम्पियन आपल्या नावावर केला. त्यामुळे सध्या देशभरात या विजयाचा आनंद साजरा केला जात आहे.
मुंबई : भारताने पाकिस्तानला हरवून नवव्यांदा आशिया कप चॅम्पियन आपल्या नावावर केला. त्यामुळे सध्या देशभरात या विजयाचा आनंद साजरा केला जात आहे. मैदानावर खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करून ट्रॉफी जिंकली आणि सोशल मीडियावर चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनी आनंद साजरा केला. पण या सगळ्यात सर्वाधिक चर्चेत राहिला तो अमिताभ बच्चन यांचा एक खास पोस्ट.
टूर्नामेंटदरम्यान माजी पाकिस्तानी खेळाडू शोएब अख्तर एका चर्चेत होता. तो पाकिस्तानच्या प्लॅनिंगबद्दल बोलत होता आणि अभिषेक शर्माचे नाव घ्यायचे असताना चुकून त्याने "अभिषेक बच्चन" असं म्हटलं. त्याच वेळी ही चूक चाहत्यांच्या नजरेतून सुटली नाही. सोशल मीडियावर याची जोरदार खिल्ली उडाली.
advertisement
भारताने अंतिम सामन्यात पाच विकेट्सनी पाकिस्तानला हरवले. त्यानंतर बिग बींनी X (ट्विटर) वर एक भन्नाट पोस्ट टाकली. त्यांनी लिहिलं, "तू जिंकलास!! छान खेळलास 'अभिषेक बच्चन'... तिथे जीभ अडखळली झाली, आणि इथे बॅटिंग, बॉलिग, फिल्डिंग न करता शत्रूला अडखळवलं ते बोलती बंद! जय हिंद! जय भारत! जय माँ दुर्गा."
T 5516(i) - जीत गये !! 🇮🇳🇮🇳 .. well played 'Abhishek Bachchan' .. उधर ज़बान लड़खड़ाई, और इधर, बिना batting bowling fielding किए, लड़खड़ा दिया दुश्मन को !!
बोलती बंद !!
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
जय हिन्द ! जय भारत ! जय माँ दुर्गा !!!!
— Amitabh Bachchan (@SrBachchan) September 28, 2025
advertisement
या पोस्टमध्ये अमिताभ बच्चन यांनी थेट शोएब अख्तरचा उल्लेख केला नसला तरी संदेश सगळ्यांना समजला. चाहत्यांनी लगेचच "ही खरी जखमेवर मीठ चोळणारी स्टाईल आहे" असं म्हणत बिग बींच्या विनोदाची वाहवा केली. अमिताभ यांची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 29, 2025 1:01 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
IND VS PAK: अमिताभ यांनी पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळलं, म्हणाले, 'काय खेळलास अभिषेक बच्चन...'