Kalyan Traffic: म्हशींनी केलं ट्रॅफिक जॅम! 500 हून अधिक म्हशी कल्याणच्या रस्त्यावर, कारण काय?

Last Updated:

Kalyan Traffic: सकाळी गोविंदवाडी बायपास रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली.

Kalyan Traffic: म्हशींनी केलं ट्रॅफिक जॅम! 500 हून अधिक म्हशी कल्याणच्या रस्त्यावर, कारण काय?
Kalyan Traffic: म्हशींनी केलं ट्रॅफिक जॅम! 500 हून अधिक म्हशी कल्याणच्या रस्त्यावर, कारण काय?
प्रदीप भणगे, प्रतिनिधी कल्याण: कल्याण शहरातील वाहतूक कोंडीची सर्वत्र चर्चा असते. शहरातील विविध रस्त्यांवर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. प्रशासनाला अद्याप त्यावर मार्ग काढता आलेला नाही. अशातच आता कल्याणकरांना एका नवीन कारणामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे. आज सकाळी गोविंदवाडी बायपास रस्त्यावर शेकडो म्हशींमुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
गेल्या दोन दिवसांपासून कल्याणमध्ये मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे रविवारी (28 सप्टेंबर) सध्याकाळी कल्याण खाडीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. पाणी वाढल्याने खाडी किनाऱ्यावरील वस्त्यांमध्ये पाणी शिरलं. या परिसरात 20 ते 25 तबेले देखील असल्याने अचानक पाणी वाढल्याने तबेल्यांमध्ये शेकडो म्हशी अडकल्या होत्या.
advertisement
महानगरपालिका प्रशासन, अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने घरात अडकलेले रहिवासी आणि तबेल्यातील 500 हून अधिक म्हशींचं रेस्क्यू करण्यात आलं. खाडीचं पाणी वस्तीत शिरल्याने अनेक नागरिकांना शाळा, समाजमंदिर तसेच नातेवाईकांच्या घरी हलवण्यात आलं. मात्र, तबेल्यातील म्हशींना ठेवायचं कुठे? असा प्रश्न निर्माण झाला होता. तबेल्यातून बाहेर काढलेल्या500 हून अधिक म्हशींना गोविंदवाडी बायपास रस्त्यावर बांधण्यात आलं.
advertisement
आज पहाटे (सोमवार) रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू झाल्याने या म्हशींमुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली. शेकडो म्हशींमुळे काही काळ वाहनचालकांची गैरसोय झाली. सध्या पावसाने विश्रांती मिळाल्याने खाडी पात्रातील पाणी ओसरत आहे. पाणी ओसरल्याने वस्तीत शिरलेल्या पाण्याचाही निचरा झाला आहे. त्यामुळे तबेला मालकांनी म्हशी पुन्हा तबेल्यात नेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी मोकळा होत आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kalyan Traffic: म्हशींनी केलं ट्रॅफिक जॅम! 500 हून अधिक म्हशी कल्याणच्या रस्त्यावर, कारण काय?
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement