Success Story: नोकरी सोडण्याचं धाडसं दाखवलं, आता तरुणाचं नशीब पालटलं, वडापाव विकून 2 लाख महिना कमावतोय!
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
Success Story: शेखर देवरे यांनी आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून वडापाव व्यवसाय सुरू केला आहे. यामधून महिन्याकाठी 2 लाखांपेक्षा अधिक कमाई ते करत आहेत.
अनेक तरुणांचे स्वप्न असते की आयटी क्षेत्रात चांगली नोकरी मिळावी, उत्तम पगार असावा आणि कॉर्पोरेट आयुष्य जगता यावं. पण धुळे जिल्ह्यातील शेखर देवरे या तरुणाने हा मार्ग न निवडता, आयटी क्षेत्रात मिळालेल्या अनुभवातून काहीतरी वेगळं करण्याचं ठरवलं. चार वर्षे आयटी क्षेत्रात काम करून आणि 50 हजारांहून अधिक पगार असलेली नोकरी सोडून त्यांनी पुण्यात कर्वेनगर भागात वडापावचा व्यवसाय सुरू केला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement