Dr. Babasaheb Ambedkar Home: मुंबईत जपलाय डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींचा अमूल्य ठेवा, एकदा तरी अवश्य भेट द्या
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
मुंबईतील दादर येथील 'राजगृह' हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असून हे पवित्र ऐतिहासिक स्थान अनेक अनुयायांचे श्रद्धास्थान आहे. डॉ. आंबेडकर यांचा भारतीय समाजकारणातील प्रभाव आणि संविधाननिर्मितीतील योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. राजगृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वास करत असताना अनेक दुर्मिळ वस्तूंचा संग्रह केला होता.
advertisement
advertisement
यामध्ये आंबेडकर कुटुंबाने वापरलेली भांडी, बाथ टब, जुने फोटो, गरम पाण्याचे यंत्र, पलंग आणि गौतम बुद्ध यांची प्रतिमा यांचा समावेश आहे. विशेषत: त्यांच्या अध्ययन कक्षातील टेबल आणि छडीसह संविधानाची प्रत देखील संग्रहित केली आहे. या कक्षातच बाबासाहेबांनी भारतीय संविधान तयार केले होते. राजगृहामध्ये बाबासाहेबांचे अस्थिकलशदेखील ठेवले गेले आहेत ज्यामुळे हा स्थान अधिक पवित्र मानला जातो.
advertisement
advertisement


