Weather Alert: वारं फिरलं, कोकणात टेन्शन वाढलं! 72 तास धोक्याचे, मुंबई-ठाण्यात हायअलर्ट

Last Updated:
Weather Alert: कोकणातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. पुढील 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता असून मुंबई, ठाण्याला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
1/5
गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम आहे. पुढील तीन दिवस या भागांमध्ये मुसळधार पाऊस होणार असून आज, 27 सप्टेंबर रोजीही पाऊस तसाच सुरू आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे, तर पालघर जिल्ह्याला यलो अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे आज संपूर्ण कोकणात मुसळधार पावसाचा जोर कायम असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

advertisement
2/5
मुंबईत आज दिवसभर मुसळधार पाऊस पडणार आहे. काल दिवसभर रिमझिम ते मध्यम सरी झाल्या होत्या, मात्र आज सकाळपासूनच आकाश ढगाळ असून जोरदार पावसाची सुरुवात झाली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पश्चिम उपनगरांसह दक्षिण मुंबईत दिवसभर मुसळधार सरी कोसळतील. दुपारनंतर पावसाचा वेग अधिक वाढेल आणि संध्याकाळच्या सुमारास वाहतुकीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. तापमान 26 ते 29 अंश सेल्सिअस दरम्यान राहणार असून दमट वातावरणामुळे
मुंबईत आज दिवसभर मुसळधार पाऊस पडणार आहे. काल दिवसभर रिमझिम ते मध्यम सरी झाल्या होत्या, मात्र आज सकाळपासूनच आकाश ढगाळ असून जोरदार पावसाची सुरुवात झाली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पश्चिम उपनगरांसह दक्षिण मुंबईत दिवसभर मुसळधार सरी कोसळतील. दुपारनंतर पावसाचा वेग अधिक वाढेल आणि संध्याकाळच्या सुमारास वाहतुकीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. तापमान 26 ते 29 अंश सेल्सिअस दरम्यान राहणार असून दमट वातावरणामुळे.
advertisement
3/5
ठाणे व नवी मुंबई या दोन्ही भागांत आज दिवसभर मुसळधार पावसाचा जोर राहणार आहे. नेरुळ, वाशी, बेलापूर, कल्याण, डोंबिवली या भागांत मुसळधार सरी कोसळत आहेत. पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचणे आणि वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने नागरिकांनी अनावश्यक बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे.

4/5
पालघर जिल्ह्याला आज यलो अलर्ट जाहीर केला आहे. किनारी भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहील, तर काही ग्रामीण भागांतही सततच्या सरी सुरू राहतील. नद्यांची पातळी वाढण्याची शक्यता असून शेतजमिनींमध्ये पाणी साचले आहे. तापमान 25 ते 28 अंश सेल्सिअस राहील.

5/5
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गया तिन्ही कोकण जिल्ह्यांमध्ये आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रायगडमध्ये घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे भूस्खलनाचा धोका कायम आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहत आहेत. समुद्र खवळलेला असून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे. सलग तीन दिवस ऑरेंज अलर्ट असल्याने या भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही कोकण जिल्ह्यांमध्ये आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रायगडमध्ये घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे भूस्खलनाचा धोका कायम आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहत आहेत. समुद्र खवळलेला असून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे. सलग तीन दिवस ऑरेंज अलर्ट असल्याने या भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
advertisement
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री, 'या' अभिनेत्यासाठी वेडी
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री असं का म्हणाली?
    View All
    advertisement