Mumbai Rain: कोकणात धो धो कोसळणार, 24 तासांत हवापालट, मुंबई, ठाण्यात काय स्थिती?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Mumbai Rain: कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. आज पुन्हा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुंबई, ठाण्यात 24 तासानंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्याता आहे.
advertisement
मुंबईत आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून, काही भागांत हलक्या सरींची नोंद झाली आहे. हवामान विभागानुसार दुपारी व संध्याकाळी काही भागांत मध्यम स्वरूपाच्या सरी पडू शकतात. मात्र आज कोणताही अलर्ट नसून शनिवारपासून पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. आजचे कमाल तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
ठाणे व नवी मुंबई परिसरात गुरुवारी संध्याकाळी जोरदार पाऊस झाला. आज दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, अधूनमधून हलक्या सरी कोसळू शकतात. बेलापूर, ऐरोली, कल्याण आणि डोंबिवली भागांत वाहतूक व्यवस्थेवर पावसाचा परिणाम होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी गरज असल्यासच घराबाहेर पडावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
advertisement
पालघर जिल्ह्यात आजही ढगाळ वातावरण असून, वाडा, डहाणू, तलासरी भागांत सकाळपासूनच अधूनमधून हलक्या सरी सुरू आहेत. हवामान खात्याने वाऱ्याचा वेग वाढण्याचा इशारा दिला असून, मच्छीमार बांधवांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 24 तासानंतर पावसाचा जोर वाढणार असून शनिवारपासून सतर्कतेचा यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
आज कोकणमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसत आहे.. सकाळपासूनच हलक्या सरी कोसळत असून संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, दिवसभर ढगाळ वातावरणमुळे आर्द्रता वाढणार असून तापमान 24–29°C दरम्यान राहील. आज रायगड, रत्नागिरीला ऑरेंज तर सिंधुदुर्गला यलो अलर्ट देण्यात आला आहे.