Weather Alert: मुंबई-ठाण्यात पाऊस रिटर्न! कोकणात धो धो कोसळणार, 48 तासांसाठी अलर्ट

Last Updated:
Weather Alert: मुंबईसह महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. आजपासून काही दिवस जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
1/5
गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानात मोठी वाढ झाली होती आणि नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत होता. पण आज, 23 ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा हवामानाने कलाटणी घेतली आहे. कोकण किनारपट्टीवरील हवामानात मोठे बदल झाले असून, हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा कोकणासह मुंबई परिसरात पावसाची हजेरी लागणार आहे.

advertisement
2/5
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून ‘ऑक्टोबर हिट’चा जोर होता. नागरिकांना दमट वातावरण आणि कडक ऊन यामुळे त्रास होत होता. पण आज हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला असून, दिवसभर अधूनमधून मुसळधार सरी पडतील. सकाळपासूनच वातावरण ढगाळ राहील, दुपारनंतर पावसाचा जोर वाढणार आहे. तापमान 27 ते 31 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. त्यामुळे मुंबईकरांनी बाहेर पडताना छत्री जवळ ठेवणे आवश्यक आहे.

3/5
ठाणे आणि नवी मुंबई भागातही आज हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. सकाळपासूनच हवेत आर्द्रता जाणवेल आणि दुपारनंतर हलक्या ते मध्यम सरी पडतील. काही भागांमध्ये विजांचा कडकडाट आणि जोरदार वाराही येण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागांमध्ये उकाडा कायम होता, त्यामुळे आजचा पाऊस स्थानिकांसाठी थोडासा दिलासा घेऊन येणार आहे.

4/5
पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ऊन कायम होते. पण आज हवामानात बदल होत असून, इथे मध्यम ते कमी प्रमाणात पाऊस पडणार आहे. सकाळी ढगाळ वातावरण, दुपारनंतर हलक्या सरींची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांच्या उकाड्यानंतर पालघरकरांनाही आज थोडा दिलासा मिळणार आहे.

5/5
कोकण किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे. या भागांमध्ये मुसळधार पावसाच्या सरी येतील. समुद्रकिनारी वाऱ्याचा वेग वाढणार असल्याने मासेमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा असला तरी आजपासून हवामानात बदल दिसून येणार आहे.

BMC Election : महापालिका निवडणुकांचे काउंटडाऊन सुरू, बिगुल कधी वाजणार, मतदानाच्या तारखेबाबत समोर आली मोठी अपडेट
महापालिकांचे काउंटडाऊन सुरू, बिगुल कधी वाजणार, मतदानाच्या तारखेबाबत समो
  • महापालिकांचे काउंटडाऊन सुरू, बिगुल कधी वाजणार, मतदानाच्या तारखेबाबत समो

View All
advertisement