Weather Alert: मुंबई-ठाण्यात आज पाऊस की उघडीप, कोकणातून महत्त्वाचं अपडेट
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: ऑक्टोबर अखेर हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. मुंबईसह कोकण परिसरातील पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोसळणारा पाऊस आता विश्रांती घेण्याची शक्यता आहे. बंगालमधील वादळामुळे ऑक्टोबरच्या अखेरीसही पावसाचा जोर कायम राहिला. आता मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जोर ओसरणार आहे. आठवडाभर यलो अलर्ट असलेल्या या भागांत आज म्हणजेच 30 ऑक्टोबर 2025 रोजी हवामान विभागाने पावसाचा कोणताही इशारा दिलेला नाही.
advertisement
advertisement
advertisement
पालघर जिल्ह्यात मात्र आजही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागानुसार, या भागात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. गेल्या काही दिवसांपासून पालघरमध्ये अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत, त्यामुळे विभागाने सावधगिरीचा इशारा कायम ठेवला आहे. किनारी भागात वारे 30 ते 40 किमी प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता वर्तवली आहे.
advertisement
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग: कोकण किनारपट्टीवरील या तिन्ही जिल्ह्यांमध्ये हवामान स्थिर झालं आहे. गेल्या काही दिवसांत पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात कमी झाला असून, आज कोणताही येलो अलर्ट नाही. हवामान खात्यानुसार, या भागात हलकी ढगाळ हवा आणि अधूनमधून सूर्यप्रकाश दिसेल. मात्र, समुद्रकिनारी नागरिकांनी अजूनही खबरदारी घ्यावी, अशी सूचना देण्यात आली आहे.









