Weather Alert: कोकणात हवापालट! मुंबईत पाऊस नाही, आता वेगळंच संकट, रविवारचं हवामान अपडेट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत असून कोकणात हवापालट झाली आहे. आज रविवारी मुंबई ठाण्यासह कोकणचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
1/5
मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि रायगड परिसरात सलग काही दिवस सुरू असलेल्या जोरदार पावसाने अखेर विश्रांती घेतली आहे. आज, 12 ऑक्टोबर 2025 रोजी, या सर्व भागांमध्ये हवामान शांत आणि स्थिर राहणार आहे. आकाश ढगाळ असले तरी बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर ओसरलेला दिसत आहे. काही भागात अधूनमधून हलक्या सरी पडतील, मात्र दिवसभर एकंदर वातावरण कोरडे आणि स्थिर राहील.

advertisement
2/5
मुंबईत आज सकाळपासून हवामान शांत आहे. आकाश थोडं अंशतः ढगाळ असलं तरी उन्हाचा पारा वाढलेला असणार आहे. दुपारच्या सुमारास सौम्य उकाडा जाणवेल, तर तापमान 31 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उकाडा वाढेल. संध्याकाळी समुद्रकिनाऱ्यांवर वाऱ्याची मंद झुळूक वाहील, ज्यामुळे वातावरण आल्हाददायक राहील.

3/5
ठाणे आणि नवी मुंबई परिसरात गेल्या काही दिवसांपासून हवामान स्थिर आहे. आजही या भागात कोरडे वातावरण राहील. सकाळी आकाशात थोडेसे ढग दिसतील, मात्र दिवसभर सूर्य तळपत राहील. तापमान 32 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील आणि वाऱ्याचा वेग ताशी 10 ते 15 किमी असेल

4/5
पालघर जिल्ह्यात ग्रामीण भागात आज हवामान अंशतः ढगाळ आहे. काही ठिकाणी सकाळी रिमझिम सरी दिसू शकतात, मात्र दिवसभर वातावरण शांत राहील. दुपारच्या सुमारास हलका उकाडा जाणवेल. तापमान 30 अंश सेल्सिअसच्या आसपास राहणार आहे, तर समुद्रकिनाऱ्यावरील वारा हलका आणि गार असेल.

5/5
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येही आज हवामान सामान्य आहे. कोकण किनारपट्टीवर समुद्र खवळलेला नाही, आणि मच्छीमारांना समुद्रात जाण्याबाबत कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. या भागात दुपारनंतर काही ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो, मात्र एकूणच दिवस कोरडा आणि नागरिकांना उकडायला सामोरं जावं लागेल.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement