Weather Alert: मुंबईसह कोकणात पावसाचं तुफान, ताशी 50 किमीने वारे वाहणार, 72 तास अलर्ट!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात ऐन दिवाळीत मोठे बदल जाणवत आहेत. पुढील 72 तास मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात तीव्र उकाडा आणि ऑक्टोबर हिटमुळे नागरिक हैराण झाले होते. पण आता हवामानात मोठा बदल पाहायला मिळतोय. काही ठिकाणी हलक्या सरी तर काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे ऐन दिवाळीतच कोकण किनारपट्टीपासून मुंबईपर्यंत पावसाचा जोर वाढत आहे. पुढील 3 दिवस कोकणातील सर्वच जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
मुंबईत गुरुवारपासून सतत सरींचा सिलसिला सुरू आहे. दिवसभर ढगाळ वातावरण असून अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. हवामान विभागाने 24 ऑक्टोबर रोजी मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांत मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सलग तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
advertisement
advertisement
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. गेले काही दिवस कोकणात पाऊस आणि ऊन असे वातावरण आहे. पण गुरुवारपासून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे आज या भागांसाठीही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात सरींसोबत वाऱ्यांचा जोर वाढल्याने हवामानात गारवा जाणवत आहे.


