Weather Alert: दिवाळीआधीच वारं फिरलं, कोकणात पुन्हा पावसाचा जोर, मुंबई-ठाण्यात वेगळीच स्थिती
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: कोकणातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर कोकणात पावसाचा जोर वाढणार असून हवामान विभागाने इशारा दिला आहे.
दिवाळीच्या तोंडावर पुन्हा एकदा कोकण किनारपट्टीवर पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून पाऊस शांत झाला होता, मात्र आता दोन दिवसांपासून रिमझिम सरी पुन्हा बरसत आहेत. आज, 17 ऑक्टोबर 2025 रोजी, हवामानात थोडाफार बदल दिसून येणार आहे. काही भागांत रिमझिम सरींचा अनुभव येईल, तर काही ठिकाणी हवामान कोरडे राहील.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कोकण किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आज हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागांत अधूनमधून रिमझिम सरी कोसळत आहेत. आजही हवामान ढगाळ राहील आणि दुपारनंतर सरींचा जोर किंचित वाढू शकतो. किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग तासाला 25 ते 30 किमीपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. शनिवारपासून 2-3 दिवस पावसाचा जोर जास्त राहील.









