Weather Alert: ऐन दिवाळीत ढगांचे फटाके फुटणार, कोकणात अलर्ट, मुंबई-ठाण्यातून महत्त्वाचं अपडेट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Weather Alert: ऐन दिवाळीत कोकणात खराखुरा पाऊस सुरू झाला आहे. आज दोन जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केल आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह कोकण किनारपट्टीवरील भागात उन्हाचा तडाखा जाणवत होता. अनेक ठिकाणी तापमान वाढल्याने नागरिकांना उकाड्याचा त्रास होत होता. मात्र, आजच्या म्हणजेच 19 ऑक्टोबरच्या हवामानानुसार काही भागांना दिलासा मिळणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये आज हवामान कोरडे असेल, तर कोकणातील काही दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये पुन्हा पावसाची हजेरी लागणार आहे.
advertisement
मुंबईत आज हवामानात थोडा बदल जाणवतो आहे. गेल्या आठवडाभरापासून सतत उकाड्याचा त्रास होत असताना आज सकाळपासूनच वातावरण किंचित गार वाटत आहे. ढगाळ वातावरणामुळे सूर्यानं डोकं वर काढलं नाही, त्यामुळे उष्णता वाढेल. शहरात आज पावसाची शक्यता नसली तरी दमट वातावरणामुळे दुपारच्या सुमारास उकाडा जाणवेल. तापमान 27 ते 31 अंश सेल्सिअस दरम्यान राहील
advertisement
ठाणे आणि नवी मुंबई या दोन्ही शहरांमध्ये आज हवामान कोरडं आणि थंड राहणार आहे. शनिवारी दुपारी काही भागात रिमझिम स्वरूपाच्या सरी झाल्या होत्या, मात्र आज पूर्ण दिवस ढगाळ पण पाऊस नसलेलं वातावरण असेल. सकाळी हवेत गारवा जाणवेल आणि दुपारनंतर उन्हाचा तडाखा वाढेल. या भागात तापमान 26 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. नागरिकांना हवामानातील आर्द्रतेमुळे दमटपणा जाणवेल.
advertisement
advertisement
कोकणातील दक्षिणेकडील भागांमध्ये मात्र हवामानात थोडी हालचाल सुरू झाली आहे. रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना हवामान विभागाने आज यलो अलर्ट दिला आहे. या भागांमध्ये मध्यम ते हलक्या सरींचा पाऊस पडणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात देखील काही ठिकाणी रिमझिम पाऊस बरसेल तर काही ठिकाणी आभाळ भरून राहील. समुद्रकिनारी वाऱ्याचा वेग थोडा वाढण्याची शक्यता असून, मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तापमान 24 ते 29 अंश सेल्सिअस दरम्यान राहील