Weather Update: पावसाचा ब्रेक, कोकणात हवापालट, मुंबई-ठाण्यात बुधवारी कसं असेल हवामान?

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने ब्रेक घेतला असून कोकणात थंडी जाणवत आहे.
1/5
महाराष्ट्रात अखेर गुलाबी थंडीची सुरुवात झाली आहे. 12 नोव्हेंबर 2025 रोजी राज्यभर कोरडे हवामान राहणार असून, पावसाने घेतलेल्या विश्रांतीनंतर आता वातावरणात गारव्याची चाहूल लागली आहे. हवामान विभागानुसार, पुढील काही दिवस मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांमध्ये आकाश निरभ्र राहील. दिवसा हलकं ऊन आणि रात्री-सकाळी गार वारा असं वातावरण कोकणात राहील.

advertisement
2/5
मुंबईत आज सकाळी आणि संध्याकाळी गारवा जाणवत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सतत पावसाने त्रास दिल्यानंतर आता आकाश स्वच्छ आणि कोरडे झाले आहे. दिवसात हलकं ऊन जाणवतंय, पण सकाळी 22°C तर दुपारी तापमान 30 °C पर्यंत जाण्याची शक्यता आहे. समुद्रकिनाऱ्यावरील भागात हलक्या वाऱ्यामुळे वातावरण सुखद असून, मुंबईकरांना आता थंडीची चाहूल स्पष्टपणे जाणवू लागली आहे.

3/5
ठाणे आणि नवी मुंबईत आजपासून थंडीचा प्रभाव वाढू लागला आहे. सकाळी तापमान 18°C ते 20°C दरम्यान राहील, तर दिवसात ते 32°C पर्यंत पोहोचेल. संध्याकाळी आणि पहाटे गार वाऱ्याची झुळूक जाणवत असून, शहरातील लोकांनी आता उबदार कपड्यांची तयारी सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे वातावरण स्वच्छ आणि कोरडे आहे. नवी मुंबईच्या किनारी भागात हलका धुकेपणा दिसून येतोय.

4/5
पालघर जिल्ह्यात थंडीची चाहूल स्पष्टपणे जाणवू लागली आहे. ग्रामीण भागात पहाटे दवबिंदू दिसू लागले आहेत. सकाळचे तापमान 17°C तर दिवसात सुमारे 31°C इतके राहण्याची शक्यता आहे. पावसाचा पूर्णपणे अभाव असून, आकाश निरभ्र आहे. समुद्रकिनारी भागात हलकी गार झुळूक, तर आतल्या भागात थंडीचा प्रभाव अधिक जाणवतोय. शेतकऱ्यांसाठी ही थंडी आनंदाची बातमी मानली जाते.

5/5
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येही आता थंडीचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. पावसाचा प्रभाव संपल्यानंतर हवेत थोडी ओलसर गारवा जाणवत आहे. दिवसाचे तापमान 32°C तर रात्रीचे तापमान 18°C पर्यंत खाली येत आहे. किनारी भागात सकाळी हलके धुके आणि दुपारी ऊन अशी स्थिती दिसून येतेय. ग्रामीण आणि डोंगराळ भागात थंडीचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे येणाऱ्या दिवसांत तापमान आणखी घटण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

BMC Election Results MIM : बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उलटफेर
बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उ
  • मुंबई महापालिकेची सत्ता भाजप-महायुतीने हिसकावली आहे.

  • एमआयएमने लक्षणीय कामगिरी करत मुंबईत ८ जागांवर विजय मिळवला.

  • मुंबईतील निवडणुकीतील या यशानंतर आता एमआयएमला मोठा जॅकपॉट लागला आहे.

View All
advertisement