Mumbai Rain: 24 तासांत हवापालट, मुंबई, ठाण्याला पुन्हा अलर्ट, रविवारचा हवामान अंदाज

Last Updated:
Mumbai Rain: मुंबईसह कोकणात पावसाने धुमाकूळ घातला आहे. आता हवामानात मोठे बदल जाणवत असून हवामान विभागाने पुन्हा इशारा दिला आहे.
1/5
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. विशेषतः मुंबईसह कोकणातील अनेक भागांमध्ये वाहतूक यंत्रणांवर मोठा परिणाम झाला. मात्र 27 जुलै रोजी हवामानात काहीसा बदल होताना दिसत आहे. भारतीय हवामान विभागाने आजसाठी काही जिल्ह्यांमध्ये यलो आणि ऑरेंज अलर्ट जाहीर केला असला, तरी अनेक ठिकाणी पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे

advertisement
2/5
मुंबईत गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लोकलसह अन्य वाहतूक सेवांवर परिणाम झाला होता. मात्र आज, 27 जुलै रोजी परिस्थिती स्थिर होत असल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे. आज दिवसभरात हलक्या पावसाची शक्यता असून, मुसळधार पावसाचा धोका नाही. त्यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

3/5
ठाणे आणि नवी मुंबई या भागात पावसाने धुमाकुळ घातला होता. पण आज काही प्रमाणात विश्रांती घेतली असून या भागांमध्ये आज मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसाचा इशारा नसला तरी वाहतुकीच्या दृष्टीने खबरदारी घेणं आवश्यक आहे. हवामान खात्याने कोणताही अलर्ट दिलेला नाही, पण आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

4/5
पालघर जिल्ह्यात आज पावसाचा जोर फारसा जाणवणार नाही. 26 जुलै 2025 रोजी म्हणजेच शनिवारी इथल्या काही भागांना रेड अलर्ट दिला होता. शाळांना सुट्टी दिली होती. पण आज हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार एक-दोन ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. पण संपूर्ण जिल्ह्यासाठी कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.

5/5
कोकणात गेल्या काही दिवसांपासून सलग ऑरेंज अलर्ट जारी होत आहे. आजच्या हवामानानुसार, रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून काही भागांमध्ये मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी आज यलो अलर्ट आहे. या भागांमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे, त्यामुळे स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
कोकणात गेल्या काही दिवसांपासून सलग ऑरेंज अलर्ट जारी होत आहे. आजच्या हवामानानुसार, रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून काही भागांमध्ये मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी आज यलो अलर्ट आहे. या भागांमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे, त्यामुळे स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी आज येलो अलर्ट आहे. या भागांमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे, त्यामुळे स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement