Weather Alert: कोकणात वारं फिरलं, मंगळवारी हवामानात मोठे बदल, मुंबई-ठाण्यात कोणता अलर्ट?
- Published by:Shankar Pawar
 - Reported by:Namita Suryavanshi
 
Last Updated:
Weather Alert: कोकणातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. मुंबई-ठाण्यात आज पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 
 नोव्हेंबरची सुरुवात झाली असली तरी हवामान अजूनही पावसाळ्यासारखं जाणवतंय. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह कोकणात रिमझिम सरी सुरुच आहेत. आज म्हणजेच 4 नोव्हेंबर 2025 रोजीही हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे शहरांत सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


