Weather Alert: नोव्हेंबरमध्येही पाऊस! कोकणातून IMD चं महत्त्वाचं अपडेट, मुंबई-ठाण्याला कोणता अलर्ट?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Weather Alert: गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असणारा पाऊस नोव्हेंबरमध्येही बरसणार आहे. आज पहिल्याच दिवशी मुंबईसह कोकणात पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बघता बघता नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. साधारणपणे या काळात कोकणासकट महाराष्ट्रात हिवाळ्याची चाहूल लागते, पण यंदा मात्र हवामानाने वेगळाच खेळ मांडला आहे. मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस अजूनही सुरूच आहे. सलग सहा महिन्यांपासून पावसाचं सत्र सुरू असून, नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी पुन्हा एकदा पावसाच्या सरींनी हजेरी लावली आहे.
advertisement
मुंबईत आज सकाळपासून रिमझिम पावसाच्या सरी कोसळताना दिसत आहेत. हवामान विभागानं सांगितल्याप्रमाणे दिवसभर अधूनमधून रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. सकाळी थोडा गारवा जाणवला असला तरी दुपारी वातावरणात दमटपणा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनी छत्री सोबत ठेवावी असा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
advertisement
ठाणे आणि नवी मुंबई या दोन्ही ठिकाणी हवामान रिमझिम ते मध्यम स्वरूपाचं राहणार आहे. काल रात्रीपासून ढगाळ वातावरण कायम असून, अधूनमधून रिमझिम पाऊस पडतोय. दुपारच्या वेळेस काही भागांमध्ये जोरदार सरींची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाणे-नवी मुंबई भागातील नागरिकांना पावसामुळे वाहतुकीत अडचणी येत आहेत.
advertisement
advertisement
कोकण किनारपट्टीवर म्हणजेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये अजूनही पावसाचं वातावरण कायम आहे. रायगडमध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही रिमझिम सरींचं आगमन आहे. काही किनारी भागांमध्ये विजेच्या कडकडाटासह सरी येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.


