advertisement

Weather Alert: कार्तिकी एकादशीला पाऊस, मुंबईसह कोकणात पुन्हा बरसरणार, आजचं हवामान अपडेट

Last Updated:
Weather Alert: नोव्हेंबरच्या सुरुवातीला देखील राज्यात पाऊस हजेरी लावत आहे. आज कार्तिकी एकादशीला मुंबईसह कोकणात पावसाची शक्यता आहे.
1/5
महाराष्ट्रात नोव्हेंबर महिना सुरू झाला असला तरी अजूनही पावसाने विश्रांती घेतलेली नाही. ऑक्टोबर अखेरीपासून सुरू असलेले पावसाळी वातावरण आज, म्हणजेच 2 नोव्हेंबर 2025 रोजी सुद्धा कायम राहणार आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

2/5
मुंबई शहरात आज दिवसभर हलक्या स्वरूपाचा रिमझिम पाऊस होण्याची शक्यता आहे. सकाळपासून वातावरण ढगाळ राहील, तर काही ठिकाणी दुपारी थोडासा पाऊस पडेल. दिवसभर तापमान 31 अंश सेल्सियसच्या आसपास राहील, तर आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने उकाडा जाणवू शकतो.

3/5
ठाणे आणि नवी मुंबईत आज रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून पाऊस होत असून, आजही काही भागांमध्ये विजांचा कडकडाटासह सरी पडू शकतात. दुपारनंतर पावसाचा जोर किंचित वाढू शकतो

4/5
पालघर जिल्ह्यात आज हलक्या स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे. सकाळी वातावरण ढगाळ राहील, तर दुपारनंतर काही भागांमध्ये थोडक्यात सरी पडू शकतात. ग्रामीण भागात काही ठिकाणी रस्त्यांवर चिखल निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

5/5
कोकण किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. काही किनारी भागांमध्ये समुद्रावर वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता असून, मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

SIM Cardमधून काढलं 26,55, 424 रुपयेचे सोनं; जुन्या सिम कार्डसाठी मार्केटमध्ये झुंबड उडाली, पण एका चुकीने जीवही जाऊ शकतो
SIM Cardमधून काढलं 26,55,424 रुपयेचे सोनं; जुन्या सिम कार्डसाठी झुंबड उडाली
  • जुन्या SIM कार्डमधून निघालं सोनं

  • SIM कार्डसाठी लोकांची झुंबड

  • पण एका चुकीने जीवही जाऊ शकतो

View All
advertisement