Weather Alert: शनिवारी अस्मानी संकट! कोकणात वादळी पाऊस, मुंबई-ठाण्याला अलर्ट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत असून कोकणात वादळी पावसाची शक्यता आहे. तर ठाणे-मुंबईला देखील शनिवारी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
1/5
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हवामानात चांगलाच बदल दिसून येतो आहे. सलग दोन दिवस मुंबईसह कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर पाहायला मिळाला. शुक्रवारी दिवसभर मुंबईत उन्हाचा चटका असला तरी सायंकाळी काही भागांमध्ये अचानक जोरदार सरी कोसळल्या. ठाणे, नवी मुंबई आणि पालघर परिसरातही अधूनमधून रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. कोकण किनारपट्टीवरही पाऊस काही ठिकाणी थांबलेला नव्हता.

advertisement
2/5
आज, 25 ऑक्टोबर रोजी, मुंबईमध्ये दिवसभर वातावरण बदलत्या स्वरूपाचं राहणार आहे. हवामान विभागाने शहरासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. काही भागांमध्ये अचानक जोरदार पावसाच्या सरी कोसळू शकतात. मुंबईचे आजचे कमाल तापमान सुमारे 33°C आणि किमान तापमान 27°C इतके राहील असा अंदाज आहे. हवेत आर्द्रता जास्त असल्याने मुंबईकरांना उकाड्याचा त्रास जाणवणार आहे. त्यामुळे दिवसभर उकाडा आणि सायंकाळी हलका पाऊस असं मिश्र हवामान राहण्याची शक्यता आहे.

3/5
ठाणे आणि नवी मुंबई परिसरातही आज हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. काही भागांमध्ये रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे, तर इतर ठिकाणी वातावरण कोरडे आणि उन्हाळी आहे. दिवसभर तापमान 32°C च्या आसपास राहील, तर सायंकाळच्या सुमारास ढगाळ वातावरणासह हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. उन्हाचा पारा मात्र दुपारच्या वेळात वाढलेला राहणार आहे

4/5
पालघर जिल्ह्यात ग्रामीण भागांमध्ये आज काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी सुरू आहेत. काही भागांमध्ये मात्र ऊन पडल्याने उकाडा जाणवतोय. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आजचा पाऊस किंचित वाढलेला दिसतो. हवामान विभागाने पालघरमध्येही यलो अलर्ट जारी केला आहे.

5/5
कोकण किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आज काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी वातावरण पूर्णपणे कोरडे आहे. हवामान विभागाने या तिन्ही जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट दिला आहे. याचा सर्वाधिक परिणाम शेतकऱ्यांवर होतो आहे. कारण, या अनिश्चित पावसामुळे भात कापणीचे काम लांबले असून, शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे.
कोकण किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आज काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी वातावरण पूर्णपणे कोरडे आहे. हवामान विभागाने या तिन्ही जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट दिला आहे. याचा सर्वाधिक परिणाम शेतकऱ्यांवर होतो आहे. कारण, या अनिश्चित पावसामुळे भात कापणीचे काम लांबले असून, शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे.याचा सर्वाधिक परिणाम शेतकऱ्यांवर होतो आहे. कारण, या अनिश्चित पावसामुळे भात कापणीचे काम लांबले असून, शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement