Weather Alert: कोकणात वारं फिरलं, मुंबई-ठाण्यातून हवामानाचं मोठं अपडेट
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: कोकणातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. गेले आठवडाभर धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने आता ब्रेक घेतला आहे. शनिवारचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
गेल्या काही दिवसांपासून कोकणपट्टीत आणि मुंबई परिसरात पावसाचा जोर कायम होता. अनेक ठिकाणी मुसळधार सरी बरसल्या होत्या. पण आज पावसाने थोडी विश्रांती घेतली असून सर्वत्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विशेष म्हणजे आज कोणत्याही जिल्ह्याला रेड, ऑरेंज किंवा यलो अलर्ट जारी केलेला नाही.
advertisement
मुंबईत आज वातावरण ढगाळ राहणार आहे. काही भागांत रिमझिम सरी तर काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. गेल्या आठवडाभरातील जोरदार पावसानंतर मुंबईकरांना आज थोडा दिलासा मिळणार आहे. कमाल तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहील. समुद्रकिनाऱ्यावर वार्‍याचा वेग मध्यम असणार आहे.
advertisement
advertisement
पालघर जिल्ह्यात आज पावसाचा जोर कमी राहील. काही भागांत रिमझिम तर काही ठिकाणी मध्यम पाऊस पडेल. आर्द्रतेमुळे दमट हवामान जाणवेल. जिल्ह्यात कोणताही अलर्ट नसल्याने मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे. कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहील. वार्‍याचा वेग कमी ते मध्यम असेल.
advertisement
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा जोर कमी होणार आहे. या भागांत अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. ढगाळ वातावरण कायम राहील आणि दमट हवा जाणवेल. या जिल्ह्यांमध्ये आज कोणताही अलर्ट नसल्याने जोरदार पावसाचा धोका नाही. कमाल तापमान सरासरी 28–30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 24–25 अंश सेल्सिअस दरम्यान राहील.









