Weather Update: दिवसा छत्री अन् रात्री स्वेटर, मुंबईसह कोकणात हवा बदलली, शनिवारचं हवामान अपडेट
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने ब्रेक घेतल्यानंतर हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. मुंबईसह कोकणात थंडीचा जोर वाढला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने उघडीप घेतली आहे. तसेच हिवाळा सुरू झाला असून सर्वत्र थंडीचा जोर वाढत आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या शीतलहरींमुळे अनेकठिकाणी थंडीची लाट जाणवत आहे. कोकण किनाऱ्यांवर पावसाने विश्रांती घेतल्याने कोरडे हवामान आणि रात्री–सकाळी थंडीचा सामना सुरू आहे.
advertisement
मुंबईत 15 नोव्हेंबर रोजी हवामान पूर्णपणे कोरडे असून सकाळ–संध्याकाळी थंडी जाणवेल. दिवसभर उन्ह आणि उकाडा कायम राहील. शुक्रवारी हे तापमान साधारणपणे 22–25 °C च्या आसपास होते. तर आज कमाल तापमान 30 °C तर किमान 20 अंश सेल्सिअस किंवा त्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
advertisement
नवी मुंबई व ठाणे भागातही आज हवामान बदल होत आहे. दिवसा अजूनही उष्णतेचा अनुभव आहे, परंतु संध्याकाळपासून थंडीने जोर पकडला आहे. ठाणे परिसरात पुढील काही दिवसांत सकाळी तापमान सुमारे 15 ते 18 अंशांदरम्यान राहू शकते. दिवसा ते 33 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. याचा अर्थ असा की दिवस आणि रात्रीतील तापमानातील फरक मोठा आहे.
advertisement
advertisement
कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पाऊस थांबला आहे आणि आता हळूहळू थंडी वाढत आहे. रात्री आणि सकाळी तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअस किंवा त्याखाली उतरू शकते, तर दिवसा तापमान सुमारे 25 ते 27 अंशांदरम्यान राहण्याची शक्यता आहे. बदलत्या वातावरणामुळे नागरिकांना आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी लागेल.









