Mumbai Rain: सावधान! मुंबईत धो धो कोसळणार, ठाण्यासह कोककणात हायअलर्ट, 24 तास धोक्याचे!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Mumbai Rain: कोकणात पावसाचा जोर वाढला असून आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबईत देखील आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम आहे. आज पुन्हा जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने कोकणात दक्षतेचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर ठाणे, पालघर परिसरात देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबईला पुढील 48 तासांसाठी यलो अलर्ट देण्यता आला आहे. आजचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
मुंबईत आज आकाश पूर्णपणे ढगाळ राहील आणि सकाळपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. विशेषतः दुपारी दादर, अंधेरी, वांद्रे, चेंबूर, मालाड या भागात पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज आहे. कमाल तापमान सुमारे 30–31 अंश, तर किमान अंदाजे 27–28 अंश सेल्सिअस असेल. हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून यलो अलर्ट जारी केला आहे. त्याचा वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
advertisement
आज 25 जून रोजी नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहील. आज दिवसभरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सकाळपासूनच नेरूळ, वाशी, पनवेल, सीवुड्स, खारघर, बेलापूर या नवी मुंबईतील भागांत पावसाच्या रिमझिम सरी सुरु राहतील. संध्याकाळी काही भागांमध्ये विजांचा कडकडाट होऊन पावसाचा जोर वाढू शकतो.
advertisement
पालघर जिल्ह्यात आज डहाणू, बोईसर, वाडा, विक्रमगड, तलासरी, जव्हार, मोखाडा इथे दिवसभर जोरदार पावसाची शक्यता आहे. सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली असून, काही भागात पावसाचा जोर अधिक जाणवू शकतो. डहाणू आणि जव्हारच्या भागांमध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दक्षतेचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
advertisement
कोकण विभागात म्हणजे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये दिवसभर मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषतः महाड, पोलादपूर, चिपळूण, दापोली, मालवण आणि देवगड या भागांमध्ये जोरदार सरी पडतील. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वाऱ्याचा वेग अधिक जाणवेल. समुद्र खवळलेला असल्यामुळे मासेमारीसाठी जाणाऱ्यांनी काळजी घ्यावी. रायगड, रत्नागिरीला ऑरेंज तर सिंधुदुर्गला यलो अलर्ट देण्यता आला आहे.


