Bus Fire: बस अग्निकांडानंतर एसटी महामंडळ अर्लट मोडवर! प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Bus Travel: हैदराबादहून बेंगळुरुला जाणाऱ्या बसला लागलेल्या आगीत अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यानंतर महाराष्ट्रातील एसटी महामंडळाने सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
हैदराबादहून बेंगळुरूला जाणाऱ्या स्लीपर कोच बसला शुक्रवारी पहाटे लागलेल्या आगीत अनेक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या दुःखद घटनेनंतर एसटी महामंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विशेष अभियान हाती घेतले आहे. या अभियानात बस प्रवाशांपासून ते स्थानकातील कर्मचारी, बसचालक आणि क्लीनर यांना सुरक्षिततेच्या उपाययोजनांची माहिती दिली जात आहे. यामध्ये पुढील प्रमाणे काही महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
advertisement
बस सुरू होण्यापूर्वी चालक आणि वाहकांनी प्रवाशांना बसमधील सुरक्षा सुविधांबद्दल सविस्तर माहिती द्यावी. यात आपत्कालीन मार्ग, हेल्पलाइन क्रमांक आणि आसनाजवळील चमकणारी सुरक्षा हातोडी यांचा समावेश असावा. तसेच, बसच्या सर्व दरवाजेजवळ कोणतेही अडथळे, जसे की सामान किंवा बॅग्ज ठेवू नयेत, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत प्रवासी त्वरीत सुरक्षितपणे बाहेर पडू शकतील
advertisement
advertisement
वातानुकूलित व शयनयान श्रेणीच्या गाड्यांमध्ये दरवाजाजवळ सुरक्षा हातोडी ठेवण्यात आली आहे. खिडकीची काच फोडण्याची गरज आल्यास केवळ या हातोडीचा वापर करावा, अशी स्पष्ट सूचना प्रवाशांना देण्यात आली आहे. या सूचनांमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित होण्यास मदत होईल, आणि प्रशासनाकडून प्रत्येकाने या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.
advertisement
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सागितलं की, ऑक्सिजन, उष्णता आणि ज्वलनशील पदार्थ यामुळे आग लागल्यास ती वाढते. या पैकी एखादा घटक कमी केला तरी आगवर नियंत्रण मिळवता येते. शयनयान बस आरामदायी असली तरी सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष केल्यास ती अत्यंत धोकादायक ठरू शकते. प्रवासी जागरूक राहिले आणि बस चालक व मालकांनी नियमांचे पालन केले, तर दुर्घटना टाळता येऊ शकतात.








