Mumbai Rain: काळजी घ्या! मुंबई, ठाण्यात पुन्हा मुसळधार, कोकणात धोक्याचा इशारा, आजचा हवामान अंदाज
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Mumbai Rain: मुंबईसह कोकणात पावसाचा जोर वाढला आहे. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
advertisement
सलग दोन दिवस मुंबईकरांना मुसळधार पावसाचा सामना करावा लागतोय. पुढील काही दिवस मुंबईत पावसाची तीव्रता कायम असणार आहे. आज म्हणेजच 23 जुलै रोजी मुंबईतील काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने पुन्हा एकदा यलो अलर्ट दिला असून सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण आहे. दुपारनंतर पावसाचा जोर वाढू शकतो.
advertisement
ठाणे आणि नवी मुंबईत पावसामुळे लोकल प्रवाशांची तारांबळ उडतेय. आजही नवी मुंबई आणि ठाणे या दोन्ही शहरी भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने येथेही यलो अलर्ट दिला असून, ढगाळ वातावरणासह अधूनमधून पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे. दोन्ही शहरांत काही भागांत पाणी तुंबण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी.
advertisement
advertisement
कोकणात शेतकऱ्यांची भात लावणी सुरू आहे. सतत पाऊस असल्यामुळे शेतकरी खूश आहेत. पण सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडला आजही ऑरेंज अलर्ट असून अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः सिंधुदुर्गमध्ये काही भागांत अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. या भागात दरड कोसळण्याचा धोका व झाडे कोसळण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.


