Mumbai Rain: विजा कडाडणार, पाऊस झोडपणार, कोकणात अलर्ट, मुंबई-ठाण्यात काय स्थिती?

Last Updated:
Mumbai Rain: कोकणात पावसाचा जोर कायम असून मुंबई, ठाणे परिसरातही जोरदार पाऊस होतोय. आज पुन्हा हवामान विभागाने 24 तासांसाठी यलो अलर्ट दिला आहे.
1/5
राज्यात मान्सूनचा जोर वाढत आहे. आज 28 जून रोजी मुंबई महानगर क्षेत्र, पालघर, ठाणे, नवी मुंबई व संपूर्ण कोकण जोरदार पावसाची शक्यता आहे. ढगाळ वातावरण, दमट हवामान आणि समुद्रकिनाऱ्यालगत वाऱ्यांचा जोर जाणवेल. आज कोकणसह मुंबई परिसराला यलो अलर्ट असून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

advertisement
2/5
मुंबईत आज दिवसभर ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. सकाळपासून हलक्या सरी सुरू राहतील, तर संध्याकाळच्या सुमारास काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तापमान 27 ते 31 अंशांच्या दरम्यान राहील. दमट हवामानामुळे उष्माघाताचा त्रास जाणवण्याची शक्यता आहे. काही सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता असल्याने योग्य ती खबरदारी घ्यावी.

3/5
ठाणे जिल्ह्यात मान्सूनची सरसर जाणवणार असून, दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः दुपारनंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल. तापमान किमान 27 अंश सेल्सिअस, तर कमाल 31 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

4/5
पालघर जिल्ह्यात हलक्या सरींसह संपूर्ण दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. दुपारनंतर काही भागांत जोरदार पावसाच्या सरी पडू शकतात. हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी यलो अलर्ट दिला आहे. तापमान 26 ते 30 अंशांच्या दरम्यान राहील. किनारपट्टी भागात समुद्र खवळलेला राहणार असून मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

5/5
कोकणच्या बहुतांश भागांत मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सकाळपासून वातावरण ढगाळ असून, दिवसभर पावसाच्या सरी सुरू राहण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये काही भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. समुद्रात वाऱ्याचा जोर वाढणार असल्याने किनारपट्टीवरील नागरिकांना आणि मच्छीमार बांधवांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement