Weather update : राज्यात थंडीचा कडाका वाढणार; महाराष्ट्राच्या या भागात आजही पाऊस, जाणून घ्या कसं असेल वातावरण?

Last Updated:
भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार आज राजधानी दिल्ली आणि आसपासच्या परिसरामध्ये थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर काही राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
1/5
नवी दिल्ली 11 डिसेंबर : भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार आज राजधानी दिल्ली आणि आसपासच्या परिसरामध्ये थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर काही राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस महाराष्ट्र, तामिळनाडू, कराईकलमध्ये पावसाचा अंदाज आहे.

advertisement
2/5
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार जम्मू, काश्मीर, लडाख, गिलगिट, मुजफ्फरबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसांच्या सरीसह बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

3/5
महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास मिचॉंग चक्रीवादळाचा प्रभाव ओसरला आहे, मात्र तरी देखील पुढील दोन ते तीन दिवस राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

4/5
राज्यामध्ये कोकण आणि विदर्भात पावसाचा अंदाज आहे, तर इतर ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. दुसरीकडे राज्याच्या काही भागात येत्या काही दिवसांमध्ये थंडी वाढण्याची शक्यता देखील आहे.

5/5
मुंबई आणि पुण्यात काही अंशी तापमानात घट होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतामध्ये बर्फवृष्टीचा अंदाज आहे. बर्फवृष्टी झाल्यास तापमानात घट होऊन मुंबईमध्ये गारठा वाढू शकतो. सकाळी आणि संध्याकाळच्या सुमारास थंडी वाढण्याची शक्यता आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement