Weather update : उत्तर भारतात गारठा वाढला; महाराष्ट्रात आज पुन्हा पाऊस, जाणून घ्या कसं असेल वातावरण?
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
पर्वतीय प्रदेशांमध्ये बर्फवृष्टी सुरू असल्यानं उत्तर भारतातील मैदानी राज्यांमध्ये गारठा वाढला आहे. मात्र दुसरीकडे आज पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
नवी दिल्ली, 8 डिसेंबर : पर्वतीय प्रदेशांमध्ये बर्फवृष्टी सुरू असल्यानं उत्तर भारतातील मैदानी राज्यांमध्ये गारठा वाढला आहे. जम्मू- काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बर्फ पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये तापमानात घट होऊन थंडी वाढली आहे.
advertisement
दुसरीकडे भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज देखील महाराष्ट्र, बिहार, झारखंड आणि पूर्वी उत्तर राज्यांमध्ये अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मिचाँग चक्रिवादळाचा प्रभाव आता कमी झाला आहे. मात्र तरीही दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये पुढील दोन दिवस पावसाची शक्यता असल्याचा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे.
advertisement
आयएमडीच्या अंदाजानुसार पुढील 48 तासांमध्ये नागालँड, मणिपूर, त्रिपूरा, मेघालय आणि आसाम, महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. तर अरुणाचल प्रदेश, झारखंड आणि बिहारच्या काही भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. छत्तीसगड, ओडिशा, मध्य प्रदेशच्या काही भागांत देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
advertisement
advertisement