Cyclone Michaung : चक्रीवादळाचा तामिळनाडूला तडाखा; अतिमुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, photos

Last Updated:
माइचोंग चक्रीवादळ आज तामिळनाडूच्या किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे चेन्नईसह तामिळनाडूतील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.
1/5
 माइचोंग चक्रीवादळ आज तामिळनाडूच्या किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे. <a href="https://news18marathi.com/national/imd-issues-cyclone-miachaung-alert-storm-bay-of-bengal-from-december-3-mhsy-1088498.html">चक्रीवादळाच्या प्रभावामुळे</a> चेन्नईसह तामिळनाडूतील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सखल भागात पाणी साचल्यानं मोठं नुकसान झालं आहे. चेन्नई, चेंगलपेट, कांचीपुरम आणि तिरुवल्लूर जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे.

advertisement
2/5
पावसासोबतच जोरदार वारं देखील असल्यामुळे चेन्नई विमानतळावरील दहा विमानांची उड्डानं रद्द करण्यात आली आहेत. ही विमान वाहतूक बेंगळुरूच्या दिशेनं वळवण्यात आली आहे. दुसरीकडे कलांदूर सबवेवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तामिळनाडूमध्ये सध्या 35 ते 80 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहत आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून नागरिकांसाठी इर्मजन्सी नंबरची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

3/5
 राज्य सरकारने ज्या भागात या वादळाचा सर्वाधिक फटका बसू शकतो अशा भागांमध्ये एनडीआरएफची पथक तैनात केली आहेत. चेन्नई, चेंगलपट्टू आणि कांचीपूरम जिल्ह्यांना <a href="https://news18marathi.com/national/cyclone-michaung-imd-issues-heavy-rainfall-alert-in-2-states-144-trains-cancelled-mhkp-1089680.html">चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अर्लट</a> जारी करण्यात आला आहे.

4/5
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार हे वादळ आता आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. या वादळाचा वेग प्रति तास 100 किमीपर्यंत पोहोचू शकतो. पाच डिसेंबरला हे वादळ उत्तर -वायव्य दिशेने पुढे सरकणार असून, त्यानंतर ते आंध्रच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.

5/5
या चक्रिवादळामुळे महाराष्ट्रात देखील काही भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस आग्नेय मराठवाडा आणि विदर्भात पुन्हा अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या राज्यावर कोणतीही वातावरणीय प्रणाली सक्रिय नाही. पण, बंगालच्या उपसागरात माइचोंग चक्रीवादळ (Cyclone Michaung) तयार झाले आहे.

Eknath Shinde BJP: पक्षाची फोडाफोडी केली, वाद घातले... ठाणे-कडोंमपामध्ये महायुतीचं काय होणार, रविंद्र चव्हाणांनी एका वाक्यात सांगितलं....
पक्षाची फोडाफोडी केली, वाद घातले... ठाणे-कडोंमपामध्ये महायुतीचं काय होणार, रविंद
  • पक्षाची फोडाफोडी केली, वाद घातले... ठाणे-कडोंमपामध्ये महायुतीचं काय होणार, रविंद

View All
advertisement