advertisement

Dana Cyclone: चक्रीवादळापुढं झुकायचं नाही, पीक वाचू शकतं, शेतकऱ्यांसाठी मोलाचं मार्गदर्शन

Last Updated:
तब्बल 110 ते 120 किलोमीटर वेगानं जोरदार वारे वाहिले, बंगालच्या उपसागरात तयार झालेलं दाना चक्रीवादळ ओडिसाच्या किनारपट्टीवर धडकलं. या वादळानं ओडिसात नुकसान केलंच, तर पश्चिम बंगाललाही तडाखा दिला. इथं 4 जणांचा बळी घेतल्याची माहिती आहे. तर, शेतपिकांचंही मोठं नुकसान केलंय.
1/5
पश्चिम बंगालमध्ये चक्रीवादळामुळे दिवस-रात्र डोक्यावर पावसाचे ढग आहेत. इथं 3 दिवस सतत पाऊस पडतोय. हवामान विभागानं शेतकऱ्यांना पीक जपण्याचं आवाहन केलंय, नेमकी कशी काळजी घ्यावी हेही सांगितलंय.

2/5
आता विविध राज्यांमध्ये हिवाळी रोप लागवडीची कामं सुरू झाली आहेत. पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात भाज्यांचं उत्पादन घेतलं जातं. मात्र यंदा जोरदार पावसामुळे आणि पुरेसं ऊन न मिळाल्यामुळे पिकाला बुरशी येण्याची शक्यता आहे.

3/5
पश्चिम बंगालमध्ये कोबी, वांगी, टोमॅटो, ब्रोकोली, पालक, इत्यादींसह अनेक भाज्यांची लागवड केली जाते. यंदा दाना चक्रीवादळ आल्यानं या भाज्यांना दरवर्षीपेक्षा जास्त जपावं लागणार आहे.

4/5
पावसाचं पाणी जमिनीत साचून राहू शकतं, त्यामुळे पिकं कुजू शकतात म्हणून सीडबेड जरा जमिनीपासून वर तयार करावे, त्यात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी, शिवाय रोपांच्या मुळाशी पाणी साचणार नाही, याचाही बंदोबस्त करावा.

5/5
दरम्यान, दाना चक्रीवादळामुळे ओडिसा आणि पश्चिम बंगालमध्ये अनेक पायाभूत सुविधांचं नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी झाडं, विद्युत खांब कोसळले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनाही काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement