बसमध्ये चढले अन् डेडबॉडीच बाहेर आली, डबल डेकर बनली मृत्यूची बस! The Burning bus चे PHOTO

Last Updated:
लखनऊमध्ये किसान पथ येथे बिहारहून दिल्लीला जाणाऱ्या डबल डेकर बसला आग लागल्याने दोन मुलांसह पाच जणांचा मृत्यू झाला. इमर्जन्सी दार उघडले नाही, त्यामुळे प्रवासी अडकले. तपास सुरू आहे.
1/7
बस प्रवाशांसाठी काळ ठरली आणि होत्याचं नव्हतं झालं. बसमध्ये चढलेल्या प्रवाशांना काळानं रस्त्यातच गाठलं. बसमधून पाच मृतदेह बाहेर आले आणि खळबळ उडाली. डबल डेकर मृत्यूची बस झाली आणि या संपूर्ण घटनेचे फोटो समोर आले आहेत. हे फोटो थरकाप उडवणारे आहेत.

advertisement
2/7
80 प्रवाशांनी भरलेल्या एका डबल डेकर बसला आग लागल्याने दोन मुलांसह पाच जणांचा मृत्यू झाला. ही बस बिहारहून दिल्लीला जात होती. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील लखनऊमधील किसान पथ इथे घडली आहे.

3/7
ही दुर्दैवी घटना आज पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली. बसचा इमर्जन्सी दार वेळेवर उघडलं नाही. यामुळे बसच्या मागच्या बाजूला बसलेले प्रवासी आतच अडकून राहिले आणि त्यांना बाहेर पडायला पुरेसा वेळ मिळाला नाही.

4/7
या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीनं जखमींना स्थानिक रुग्णालयात उपाचारासाठी दाखल केलं. तर पाच मृतदेह ताब्यात घेतले आहेत. बसला आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध सुरू आहे.

5/7
दरम्यान बसला आग लागल्याने प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी धावपळ सुरू केली. त्यातच इमर्जन्सी दरवाजा लॉक झाला आणि त्यामुळे सगळ्या प्रवाशांना बाहेर पडता आलं नाही. आगीचा भडका उडाला आणि पाच प्रवासी होरपळले. यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे.

6/7
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आग कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे. या बसमध्ये पाच-पाच किलोचे सात गॅस सिलेंडर होते. हे सिलिंडर सुदैवाने फुटले नाहीत अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी आल्याने मोठं नुकसान झालं आहे.

7/7
 प्रशासनाकडून मृतांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती मदत पुरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे बसच्या सुरक्षिततेचा आणि आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याच्या व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

OTT Movies: तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; हे आहेत बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा
तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा
    View All
    advertisement