एकाच राज्यात जन्म, दुसऱ्या राज्यात प्रेम, तिसऱ्या राज्यात लग्न! '2 स्टेट्स'पेक्षाही भारी IAS-IPS अधिकाऱ्यांची Love Story; पत्नी पतीपेक्षा मोठी

Last Updated:
IAS Love Story: एकाच राज्यात जन्म, दुसऱ्या राज्यात प्रेम आणि तिसऱ्या राज्यात लग्न तेही व्हॅलेंटाईन डेला... एक आयएएस आणि एक आयपीएस... फिल्मी वाटावी अशी ही रिअल लव्ह स्टोरी. तुषार सिंग आणि नवजोत यांची प्रेमकहाणी.
1/5
तुम्ही कितीतरी रोमँटिक फिल्म्स पाहिल्या असतील. कित्येक सेलिब्रिटी कपल, त्यांच्या लव्ह स्टोरी तर कायम चर्चेत असतात. पण रोमँटिक फिल्म्स आणि सेलिब्रिटी कपल्सच्या लव्हस्टोरीपेक्षाही भारी अशी स्टोरी आहे ती प्रशासकीय अधिकाऱ्यांची... एक आयएएस आणि तर दुसरा आयपीएस... दोघांचाही जन्म एकाच राज्यात, दुसऱ्या राज्यात प्रेम आणि तिसऱ्या राज्यात लग्न... 2 स्टेट्सच्या पुढे गेलेलीही अशी ही प्रेमकहाणी.

advertisement
2/5
आयपीएस नवजोत सिमी आणि आयएएस अधिकारी तुषार सिंग, दोघंही पंजाबचे आहेत. यूपीएससीची तयारी सुरू असताना बिहारच्या पाटणात ते पहिल्यांदा एकमेकांना भेटले. एका रेस्टॉरंटमध्ये त्यांची भेट झाली. तिथं डेट करण्यापासून त्यांचं नातं सुरू झालं. 

3/5
IAS तुषार सिंगला यांनी IIT दिल्लीमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी मिळवली.  नंतर त्यांनी JNU मधून सार्वजनिक प्रशासनात पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. 2013 मध्ये ते पहिल्यांदाच UPSC परीक्षेला बसले. पहिल्या प्रयत्नात ते फक्त UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले. दुसऱ्या प्रयत्नात 2014 साली ते 86 वा रँक मिळवून ते IAS अधिकारी झाले.

4/5
नवजोत सिमी यांनी लुधियानाच्या बाबा यशवंत सिंग डेंटल कॉलेजमधून बीडीएस पदवी पूर्ण केली. 2017 मध्ये त्या UPSC CSE मध्ये 735 वा रँक मिळवून IPS अधिकारी झाल्या. हैदराबादमधील सरदार वल्लभभाई पटेल पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी बिहार कॅडरमध्ये एसीपी (पाटणा) आणि इतर जिल्ह्यांमध्ये पोलीस अधिकारी म्हणून काम केलं.

5/5
बिहारमध्ये डेटिंग ते पश्चिम बंगालमध्ये वेडिंग, असा त्यांचा प्रवास. 14 फेब्रुवारी 2020 रोजी व्हॅलेंटाईन डेला पश्चिम बंगालच्या हावडामध्ये त्यांनी लग्न केलं. यूपीएससी असण्याशिवाय या कपलचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या वयात असलेला फरक. सामान्यपणे पती पत्नीपेक्षा मोठा असावा असं सांगितलं जातं. पण मनोरंजन क्षेत्रात तुम्हाला पतीपेक्षा पत्नी मोठी असलेले कित्येक कपल माहिती असतील. नवजोत आणि तुषार यांच्यातही वयाचा असाच फरक आहे, पत्नी पतीपेक्षा मोठी. नवजोत या तुषार यांच्यापेक्षा 2 वर्षे 5 महिन्यांनी मोठ्या आहेत. तुषार हे पत्नी नवजोत यांच्यापेक्षा अडीच वर्षांनी लहान.

BMC Election: पहिल्या तासात  ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात दुबार मतदार आढळला,  मतदान केंद्रावर खळबळ, पुढं नेमकं काय झालं?
पहिल्या तासात ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात दुबार मतदार आढळला, मतदान केंद्रावर खळबळ
  • मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू

  • काहींची नावे वगळल्याचे प्रकारही समोर आले आहेत.

  • दादरमध्ये दुबार मतदार आढळल्याने खळबळ उडाली.

View All
advertisement