उत्तरकाशीच्या मदतीला धावली Indian Army, शेअर केले घटनास्थळावरील काळजाचा थरकाप उडवणारे Exclusive PHOTOs

Last Updated:
Uttarkashi cloudburst Indian Army rushes to help : देवभूमी उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात झालेल्या ढगफुटीमुळे धारली हे गाव पूर्णपणे जमीनदोस्त झालं आहे. त्यासाठी आता इंडियन आर्मीने बचावकार्य सुरू केलंय.
1/7
उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धारली गावात खीर गंगा नदीच्या वरच्या भागात ढगफुटी झाल्याने भयानक पूर आला. गंगोत्री धामला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या मार्गावर असलेल्या या गावात मोठ्या प्रमाणात विनाश झाल्याचं पहायला मिळालं. पुराचे पाणी परिसरातून वाढत गेले आणि घरे, दुकाने आणि पायाभूत सुविधा वाहून गेल्या.

advertisement
2/7
अशातच आता निर्सगाचा विद्धवंस पाहता इंडियन आर्मीने मोर्चा सांभाळला असून बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. तातडीने प्रतिसाद देत भारतीय सैन्याने 150 जवानांना तातडीने मदत केली, जे 10 मिनिटांत घटनास्थळी पोहोचले आणि तातडीने बचाव कार्य सुरू केले.

3/7
मंगळवारी दुपारी 1:45 वाजता हर्षिल येथील भारतीय लष्कराच्या छावणीपासून सुमारे 4 किमी अंतरावर असलेल्या धारली गावाजवळ भूस्खलन झाल्याची माहिती इंडियन आर्मीने दिली आहे.

4/7
नुकत्याच समोर आलेल्या वृत्तानुसार, आत्तापर्यंत आर्मीने तब्बल 130 लोकांचा जीव वाचवला असून अजूनही बचावकार्य सुरूच आहे. जखमींना हर्षिल येथील भारतीय लष्कराच्या वैद्यकीय सुविधेत वेळेवर आणि प्रभावी वैद्यकीय मदत मिळत आहे.

5/7
स्थानिक नागरिकांकडून आणि सेनाकडून शोध आणि बचाव कार्य चालू आहे, उर्वरित अडकलेल्या व्यक्तींना शोधण्यासाठी आणि मदत करण्यासाठी सर्व उपलब्ध संसाधने तैनात केली आहेत.

6/7
लष्कर, आयटीबीपी, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथकांनी 130 जणांना वाचवलं, अशी माहिती सरकारकडून देण्यात आलीये. भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, उत्तरकाशीतील ढगफुटीचा फटका इंडियन आर्माला देखील बसला आहे.

7/7
दरम्यान, इंडियन आर्मातील छावणीतून 8 ते 10 सैनिक बेपत्ता असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर आता जिल्ह्यातील अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement