Operation Sindoor : दहशतवाद्यांना नेम धरून गाडलं, इमारतीही कोसळल्या, मिसाईल हल्ल्यानंतरचे मुझफ्फराबादचे Photo
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याला भारतीय लष्कर आणि भारतीय वायूसेनेने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. बुधवारी मध्यरात्री भारताने पाकव्याप्त काश्मीरमधल्या दहशतवादी कॅम्पवर हल्ले केले आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मुजफ्फराबाद येथे लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीनचे प्रशिक्षण तळ आहेत. 2008 च्या मुंबई हल्ल्याचा एक सूत्रधार अबू जुंदालने खुलासा केला होता की मुजफ्फराबादमधील लष्कर-ए-तैयबाच्या शिबिरांमध्ये पॅराग्लायडिंगसह विविध प्रशिक्षण दिले जातात. 2019 मध्ये इंडियन एअरफोर्सने मुजफ्फराबादमधील दहशतवादी तळांवर बॉम्बफेक केली होती.
advertisement
भारताने हल्ला केलेल्या 9 ठिकाणांमध्ये कोटली टेरर कॅम्पचाही समावेश आहे. कोटली हेदेखील पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे. पाकिस्तानी सैन्याने कोटली क्षेत्रात दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे स्थापन केली आहेत. जिथे स्थानिक लोकांना शस्त्रास्त्रांचा वापर आणि घुसखोरीच्या तंत्रांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर त्यांना भारतात पाठवले जाते. कोटली क्षेत्रातील सक्रिय टेरर कॅम्पमध्ये सेंसा, गुलपूर, फागोश आणि डुबगी यांचा समावेश आहे. याच ठिकाणांहून दहशतवादी भारतात घुसखोरी करतात.
advertisement