Marriage Relation : 'लग्न म्हणजे शारीरिक संबंधांसाठी लायसन्स नाही', हायकोर्टाने का दिला असा निर्णय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
High Court on Wife Husband Relationship : लग्न झालं म्हणजे अनेकांना शारीरिक संबंधांना परवानगी मिळाल्याचं लायसन्स असंच वाटतं. पण याबाबत हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. जो प्रत्येक कपलला माहिती हवा.
advertisement
advertisement
पत्नीने पोलिसात तक्रार केल्यानंतर पतीने अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली. पण सत्र न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली. त्यानंतर त्याने गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 5 जानेवारी 2026 रोजी गुजरात हायकोर्टात या प्रकरणावर सुनावणी झाली. हायकोर्टानेसुद्धा पतीची याचिका फेटाळली आहे.
advertisement
या प्रकरणातील आरोपीचं हे दुसरं लग्न आहे. त्याच्या पहिल्या पत्नीने देखील त्याच्यावर अशाच प्रकारचे आरोप केले होते. त्यावरून आरोपी हा पुन्हा पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा करत आहे. त्याला तशी सवय लागल्याचं दिसतं. पीडितेवर झालेला शारीरिक तसंच लैंगिक अत्याचार हा गंभीर स्वरूपातील गुन्हा आहे, असं कोर्टाने म्हटलं.
advertisement
कोर्टाने म्हटलं की, लग्नानंतर पती-पत्नीमधील शारीरिक संबंध सामान्य आहेत, पण ते एकमेकांच्या इच्छेने, सहमतीने व्हायला हवेत. विवाहित जोडप्यातील एकाने दुसऱ्याबरोबर अनैसर्गिक, इच्छेविरोधात जाऊन शारीरिक संबंध ठेवले तर जोडीदाराला शारीरिक तसंच मानसिक इजा होते. त्याच्या किंवा तिच्या मनावर आघात होतो. विवाह म्हणजे शरीरसंबंधांना गृहित संमती नाही, वैवाहिक जीवनात जोडीदाराला शारीरिक स्वातंत्र्य आहे, असं निरीक्षण गुजरात उच्च न्यायालयाने याचिका फेटाळताना नोंदवलं आहे. (सर्व फोटो : प्रतीकात्मक/AI Generated)








