दहशतवादाविरोधात शेतकऱ्यांची एकजूट! 'या' प्रसिद्ध पिकाची निर्यात थांबवली, पाकिस्तानला मोठा झटका!
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट आहे. या पार्श्वभूमीवर भारतपूर जिल्ह्यातील वैरा आणि बयाना विभागातील शेतकऱ्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी...
काश्मीरमधील पहलगाममध्ये अलीकडे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकलं आहे. या घटनेनंतर देशभरात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. याचे पडसाद आता राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातही दिसू लागले आहेत. भरतपूरच्या वैर आणि बयाना उपविभागातील शेतकऱ्यांनी पाकिस्तान विरोधात एक मोठा आणि कडक संदेश देणारा निर्णय घेतला आहे.
advertisement
येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला आहे की, ते आता त्यांच्याकडील प्रसिद्ध पानाचं पीक पाकिस्तानला निर्यात करणार नाहीत. प्रत्येक गावात बैठका घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे की, जोपर्यंत पाकिस्तानच्या भूमीवरून दहशतवाद पूर्णपणे संपुष्टात येत नाही, तोपर्यंत भरतपूरच्या शेतकऱ्यांचे पाकिस्तानसोबत कोणत्याही प्रकारचे व्यापारी संबंध राहणार नाहीत.
advertisement
हे पान भरतपूरचं एक प्रमुख शेती उत्पादन आहे, ज्याला केवळ देशातच नाही तर परदेशातही, विशेषतः पाकिस्तानमध्ये खूप मागणी आहे. पण आता शेतकऱ्यांनी राष्ट्रीय हितासाठी याची निर्यात थांबवण्याचा निर्णय घेऊन एक मोठा संदेश दिला आहे. शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की, जेव्हा आपल्या देशाचे सैनिक आणि नागरिक सीमेवर आपले प्राण गमावत आहेत,
advertisement
advertisement
advertisement